JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Health Tips : बोटं मोडल्याने होऊ शकतो आर्थ्रायटिस? जाणून घ्या या मागचं सत्य

Health Tips : बोटं मोडल्याने होऊ शकतो आर्थ्रायटिस? जाणून घ्या या मागचं सत्य

अनियमित डाएट, व्यायामाचा अभाव किंवा जिममध्ये जाऊन ठराविक वेळेपेक्षा अधिक व्यायाम करणं, अनाठायी जागरणं यामुळे तब्येतीवर परिणाम होतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : अनेकदा आपल्या काही सवयींमुळे तब्येतीच्या गंभीर तक्रारी निर्माण होऊ शकतात. अनियमित डाएट, व्यायामाचा अभाव किंवा जिममध्ये जाऊन ठराविक वेळेपेक्षा अधिक व्यायाम करणं, अनाठायी जागरणं यामुळे तब्येतीवर परिणाम होतो. काहींना हात बधीर झाल्यावर हात झटकणं, बराचवेळ बसल्यानंतर जागीच बसून पाठ मोडणं अशा सवयीही असतात. परंतु, याचा तब्येतीवर परिणाम होतो का याबद्दल अनेकांना जाणीव नसते. अनेकांना आपली बोटं मोडण्याची फार सवय असते.

अर्थात, यामागे प्रत्येकाची काही कारणं असतात. कुणाला बोटं मोडल्यावर बोटांना आराम पडतो असं वाटतं, तर काहींना बोट मोडताना येणारा आवाज ऐकायला आवडतं. परंतु, अशाप्रकारे बोटं मोडणं हे खरंच शरीरासाठी उपयुक्त असतं का? जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. याबद्दलचं सविस्तर वृत्त ‘ जागरण’ने दिलं आहे.

बोटं मोडणं ही अनेकांसाठी सामान्य बाब आहे. परंतु, याचा अतिरेक मात्र त्रासदायक ठरू शकतो. इतकंच नाही, घरात बसून बोट मोडणं हे निषिद्ध मानलं जातं. यासाठी आपल्या घरातील वडिलधार्‍यांकडून वेळोवेळी कानउघाडणीही होते. बोटं मोडल्याने आर्थ्रायटिस होऊ शकतो असं म्हटलं जातं. अर्थात, संधिवाताची समस्या निर्माण होऊ शकते. शास्त्रज्ञांनी याबाबत केलेलं संशोधन महत्त्वाचं आहे. बोटं मोडणं हे शरीरासाठी खरंच हानीकारक ठरतं का, हे जाणून घेऊ.

संबंधित बातम्या

बोटं मोडल्याने उद्भवते आर्थ्रायटिसची समस्या?

काही लोकांच्या मते, बोटं मोडल्याने आर्थ्रायटिस होतो. परंतु, हा मोठा गैरसमज आहे. या संदर्भात विविध संशोधनं करण्यात आली आहेत. या विषयावर संशोधन करणार्‍या डोनाल्ड अंगर यांनी वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत फक्त एकाच हाताची बोट मोडली, तर दुसऱ्या हाताची बोटं मोडली नाहीत. असं केल्याने आर्थ्रायटिस होतो का हेच त्यांना जाणून घ्यायचं होतं. परंतु, त्यांच्या असं निदर्शनास आलं की इतकी वर्ष एकाच हाताची बोटं मोडूनही त्यांना आर्थ्रायटिसचं दुखणं उद्भवलं नाही.

जाहिरात

बोटं मोडताना आवाज का येतो?

आपल्या शरीरातील स्नायू हे सांध्याच्या आधारे एकमेकांशी जोडले गेले आहेत. या सांध्यामध्ये फ्लुईड असतं. या फ्लुईडमध्ये गॅस भरलेला असतो. यासाठी आपण जेव्हाजेव्हा बोटं मोडतो, तेव्हा सांध्यामधील गॅस अर्थात कार्बन डायऑक्साईड बुडबुड्याच्या रूपात बाहेर येतो. यातून गॅस बाहेर येतो. बोटं मोडल्यावर येणारा आवाज हा या गॅसचाच असतो. बोटं मोडल्यामुळे तुमच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु, याचा अतिरेक झाल्यास तुमची बोटं दुखू शकतात. तसंच बोटं सुजणं आणि सांध्यांवर काळे डाग दिसणं यासारख्या गोष्टी दिसून येतात.

जाहिरात

दिवसाच्या कुठल्याही वेळी बोट मोडणं चुकीचं मानलं जातं. याचा संबंध अंधश्रद्धेशी आहे. परंतु, यामागचे खरे कारण जाणल्यावर अनेकांच्या मनातील अंधश्रद्धाही नक्कीच दूर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या