JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / Strong Immunity साठी रिकाम्या पोटी खा 7 पदार्थ

Strong Immunity साठी रिकाम्या पोटी खा 7 पदार्थ

इम्युनिटी वाढवण्यासाठी (Increase Immunity) सहज मिळणारे काही पदार्थ रिकाम्या पोटी (Empty stomach) खाल्ल्याने फायदा होतो.

0107

लसणात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी सकाळी कोमट पाण्याबरोबर रिकाम्या पोटी लसूण खावं

जाहिरात
0207

आयुर्वेदात मधाला खूप महत्त्व आहे. 1 चमचा मध नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मिसळून घेतल्यास वजन कमी करण्यासह त्वचा उजळते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासदेखील मदत होते. सर्दी, खोकला यासारख्या त्रासांमध्येही आराम मिळतो.

जाहिरात
0307

दररोज 8 -10 बदामा खाल्ल्याने आपली इम्युनिटी वाढते. बदाम खाण्याने बुद्धी तल्लख होते. त्यामुळे बदाम रात्रभर भिजत ठेवून सकाळी रिकाम्या पोटी खावेत.

जाहिरात
0407

फळांचा समावेश सकाळच्या नाश्त्यात असायला हवा. सफरचंदही सकाळी खाऊ शकता. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. सफरचंदामुळे इम्युनिटी वाढते.

जाहिरात
0507

संत्री, लिंबू ही फळं आपल्या शरीरातील कुठल्याही प्रकाराच्या इन्फेक्शनचा नायनाट करतात आणि आपली इम्युनिटी वाढवतात त्यामुळे संत्री, लिंबू दररोज आपल्या आहारात असावीत.

जाहिरात
0607

आवळ्यात भरपूर व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आवळा उपयुक्त मानला जातो, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर आवळा खाल्ला तर तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

जाहिरात
0707

दररोज अंडी खाल्ल्यास अनेक रोग दूर होऊन शरीराची ताकद वाढते. अंड्यात व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन असतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या