यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रेकेत सापडलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन भारतातही दिसून येत आहे. काय आहेत या नव्या कोरोनाची लक्षणं?
गेलं वर्षभर सुरू असलेली कोरोनाची साथ थांबण्याचं नावचं घेत नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे.
पुन्हा एकदा देशात कोरोनानं आपली पकड घट्ट केलेली दिसून येत आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
त्यातच देशात नवीन कोरोना स्ट्रेननं शिरकाव केला आहे. युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका नंतर आत्ता हा नवा कोरोना स्ट्रेन भारतात सुद्धा आढळून येत आहे.
कोरोनाचा हा नवा विषाणू थेट लोकांच्या घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने कोरोना बद्दलकोरोना विषाणूत जनुकीय बदल होऊन हा नवा स्ट्रेन झाला आहे. तो थेट लोकांच्या घसा, फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने कोरोना बद्दलची धास्ती अजूनच वाढली आहे.ची धास्ती अजूनच वाढली आहे.
यातील महत्त्वाचं लक्षण म्हणजे आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. तसंच वारंवार शौचास जावं लागतं, असंही दिसून आलं आहे.
यामध्ये लागण झालेल्या व्यक्तीना आधीसारखचं श्वास घेण्यास अडचण होतं आहे. वारंवार खोकला येत आहे. त्याचबरोबर अंगात तापसुद्धा आढळून येत आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमध्ये सुद्धा लागण झालेल्यांना अन्नपदार्थांचा वास नं येणं, खाद्यापादार्थांची चव नं जाणवणं अशी लक्षणे सुद्धा आढळून येत आहेत.
देशात नवीन कोरोना स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे देश पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याच्या मार्गावर आहे.