JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हेल्थ / नव्या UK व्हायरसचा धोका वाढला! 1 एप्रिलपासून केंद्राचे नवे नियम जाणून घ्या 12 मुद्द्यांत

नव्या UK व्हायरसचा धोका वाढला! 1 एप्रिलपासून केंद्राचे नवे नियम जाणून घ्या 12 मुद्द्यांत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. याचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने सर्वांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

0112

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. याचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने सर्वांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

जाहिरात
0212

त्याचबरोबर युके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये B.1.1.7. हा नवीन कोरोना व्हेरीयेंट आढळून आला आहे. त्यामुळे आपल्या देशातही सतर्कता वाढली आहे.

जाहिरात
0312

कोरोनाचा वाढता प्रभाव बघून, केंद्र सरकारने लॉकडाऊन बाबत नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. 1 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत हे नियम लागू करण्यात येणार आहेत. तर जाणून घेऊया हे नवे निर्बंध काय आहेत.

जाहिरात
0412

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून गृहमंत्रालयाने नवीन निवेदन जाहीर केलं आहे. यात कोरोनाशी लढण्यासाठी उपाय करण्याचा हक्क स्थानिक प्रशासनाला देण्यात यावा असं म्हटलं आहे. म्हणजे आत्ता स्थानिक, जिल्हा किंवा तालुका पातळीवर लॉकडाऊन होऊ शकतं .

जाहिरात
0512

आत्ता तर लॉकडाऊन झालं तर कोणत्याही प्रमाणात प्रवासाचे निर्बंध नसतील.

जाहिरात
0612

या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारची जिल्हा बंदी नसणार आहे. राज्या-राज्यामधील प्रवासी वाहतूक सुरु राहील.

जाहिरात
0712

आत्ता कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र आवश्यक ते निर्बंध असणार आहेत. SOP चं पालन करून व्यवहार चालू ठेवण्यात येतील.

जाहिरात
0812

त्याचबरोबर कोरोनाचा जो नवा स्ट्रेन आला आहे, त्याचा जास्त धोका तरुणाईला असल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात
0912

या नव्या स्ट्रेनचे आत्तापर्यंत 795 रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आता वृद्धांसोबत तरुणांना देखील कोरोना लस देण्याची मागणी करण्यात येत आहे.

जाहिरात
1012

युकेच्या या नव्या स्ट्रेनवर कोव्हीशिल्ड लस फायदेशीर असल्याचा दावादेखील तज्ञांकडून करण्यात येत आहे.

जाहिरात
1112

पंजाबमध्ये 401 नमुन्यांपैकी 80 % तरुण नव्या युके स्ट्रेनने पोसिटीव्ह असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितलं आहे.

जाहिरात
1212

आत्तापर्यंत 45 पेक्षा जास्त वय असलेल्या व ज्यांना इतरही आजार आहेत. अशा लोकांना लस देण्यात येत होती. मात्र आता 45 पेक्षा जास्त वय असलेल्या मात्र ज्यांना इतर कोणताही आजार नाही अशाही लोकांना लस देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून हे लसीकरण सुरु होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या