JOIN US
मराठी बातम्या / Explainer / World Ocean Day 2022: महासागरांशिवाय मानवी जीवन अशक्य! ते नसतील काय होईल वाचा

World Ocean Day 2022: महासागरांशिवाय मानवी जीवन अशक्य! ते नसतील काय होईल वाचा

8 जून रोजी जागतिक महासागर दिवस साजरा केला जातो. जागतिक महासागर दिनाशी संबंधित मनोरंजक तथ्ये, इतिहास आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला येथे मिळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जून : जागतिक महासागर दिवस म्हणजेच world Ocean day 8 जून रोजी साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला महासागरांशी संबंधित अशाच काही तथ्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. आत्तापर्यंत आपल्याला महासागरांची माहिती फक्त त्यात निर्माण होणाऱ्या वादळांपर्यंतच आहे. परंतु, महासागरांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. महासागरांमध्ये उपस्थित असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी महासागर हे वनस्पतींचे, अनेक प्रजातींचे प्राणी आणि महत्त्वपूर्ण जीवांचे भांडार आहेत, शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार ते पृथ्वीचे तापमान राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनातील महासागरांचे महत्त्व लक्षात घेऊन, संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कायदा 8 जून रोजी जागतिक महासागर दिवस साजरा करतात. जागतिक महासागर दिवसाचा इतिहास 8 जून 1992 रोजी रिओ दि जानेरो येथील ग्लोबल फोरममध्ये महासागर दिवस पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आला होता. तथापि 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठराव केला की संयुक्त राष्ट्रांनी 8 जून हा दिवस ‘जागतिक महासागर दिवस’ म्हणून घोषित केला जाईल. यानंतर 2009 मध्ये पहिला जागतिक महासागर दिवस ‘आपले महासागर, आपली जबाबदारी’ या थीमसह साजरा करण्यात आला कृषी उत्पादन वाढवण्याचं तंत्र सापडलं? या गोष्टीनंतर तुमच्या शेतीचीही होईल भरभराट महासागर दिवस का साजरा करतात? महासागर दिवस साजरा करण्याचा उद्देश हा आहे की महासागर आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला कळू शकेल. आपल्याला महासागरातून अनेक प्रकारची औषधे मिळतात, ज्यात जीव वाचवण्यापासून ते कर्करोगापर्यंतच्या औषधांचा समावेश होतो. म्हणूनच महासागराचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे. उद्देश काय? हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे महासागरांवर मानवी कृतींच्या प्रभावाविषयी लोकांना माहिती देणे आणि शिक्षित करणे, नागरिकांची जागतिक चळवळ विकसित करणे आणि जगातील महासागरांच्या शाश्वत व्यवस्थापनाच्या प्रकल्पावर जगातील लोकसंख्येला एकत्र करणे. जागतिक महासागर दिवस 2022 थीम त्यासाठी दरवर्षी एक थीमही जारी केली जाते. या वर्षाची थीम म्हणजे 2022 पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती आहे. (Revitalization: Collective Action for the Ocean.) विचारवंतांनी सांगितले महासागर महत्त्वाचे अनेक विचारवंत आणि लेखकांनी महासागरांच्या फायद्यांबद्दल सामान्य लोकांना महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सिल्व्हिया अर्लने म्हटल्याप्रमाणे, “नो वाटर, नो लाइफ, नो ब्लू, नो ग्रीन”. विल्यम वर्डस्वर्थ म्हणाले की “महासागर शक्तिशाली हार्मोनिस्ट आहेत”, तर बेथनी हॅमिल्टन म्हणाले की “देवाच्या निर्मितीचा महासागर जाणून घेणे म्हणजे देवाच्या देणगीचा आनंद घेण्यासारखे आहे”. तसेच अनेकांनी महासागरांचे महत्त्व शब्दांत मांडले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या