JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / राजा असो की शासक रात्रीत बदलली हवा! असे शक्तीशाली राष्ट्रप्रमुख ज्यांना सोडावा लागला देश!

राजा असो की शासक रात्रीत बदलली हवा! असे शक्तीशाली राष्ट्रप्रमुख ज्यांना सोडावा लागला देश!

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबायो त्यांच्या पत्नी आणि दोन सुरक्षा रक्षकांसह श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानातून मालदीवला पळून गेले. ते मालदीवमधून अज्ञात ठिकाणी जातील असं बोललं जात आहे. अनेक कारणांमुळे जगातील अनेक राष्ट्रप्रमुख आपल्या देशातून पळून गेले ते परतलेच नाही. यातील आपल्या शेजारी राष्ट्रांचाही समावेश आहे. आम्ही अशाच काही राष्ट्रप्रमुखांबद्दल सांगत आहोत.

0108

इजिप्तमध्ये एकेकाळी राजेशाही होती. मात्र, 1952 मध्ये झालेल्या क्रांतीनंतर या देशातील मुहम्मद अली घराण्याचा शेवटचा वारसदार केवळ एक वर्षाचा असताना त्याला देशाबाहेर काढण्यात आले. या उत्तराधिकार्‍याचे नाव फौद द्वितीय आहे. ते आता 70 वर्षांचे असून ते देशाबाहेर राहत आहेत. इजिप्तमधून पळून गेल्यानंतर त्याला प्रथम स्वित्झर्लंडला नेण्यात आले आणि मोठे झाल्यानंतर तो पॅरिसला गेला. तिथे त्याने लग्न केले. त्यांना तीन मुले होती. पण घटस्फोटानंतर ते स्वित्झर्लंडला परत गेले.

जाहिरात
0208

14 व्या दलाई लामा यांच्या भारतात आगमनाची कहाणी सर्वांनाच ठाऊक आहे. चीनने तिबेटवर ताबा मिळवल्यानंतर ते रातोरात तेथून निसटून भारतात आले. तेव्हापासून ते येथे आहेत. धर्मशाळेतून ते तिबेटमधील निर्वासित सरकार चालवत आहेत. (विकी कॉमन्स)

जाहिरात
0308

झांझिबारचा सुलतान अब्दुल्ला अल सैद हा तिथल्या राजघराण्याचा शेवटचा शासक होता, पण 1964 च्या क्रांतीनंतर त्याला तेथून पळ काढावा लागला. आधी तो ओमानला पळून गेला आणि तिथून आता पत्नी आणि मुलांसह ब्रिटनमध्ये राहत आहे. (विकी कॉमन्स)

जाहिरात
0408

अर्जेंटिनाच्या महिला अध्यक्ष, इसाबेल मार्टिनेझ पेरोन, 1974 मध्ये देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. पण दोन वर्षांनी त्यांना गादी सोडावी लागली. त्यापूर्वी देशाचे राष्ट्राध्यक्ष जुआन पेरोन यांची ती तिसरी पत्नी होती. पतीच्या अध्यक्षपदाच्या काळात त्या उपराष्ट्रपतीही झाल्या. 1974 मध्ये पतीचे निधन झाल्यावर त्यांनी सत्ता हाती घेतली. पण त्यानंतर लष्करी उठाव झाला. त्यांना 5 वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले. कशा तरी त्या 1981 साली तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या. तेव्हापासून त्या स्पेनमध्ये राजकीय आश्रय घेऊन राहत आहे. (विकी कॉमन्स)

जाहिरात
0508

इथिओपियाचे पंतप्रधान मेंगित्सु हेली मरियम लष्करी अधिकारी ते राजकारणी बनून देशाचे शासक झाले. 1971 ते 1991 पर्यंत त्यांनी इथिओपियावर बिनदिक्कतपणे राज्य केलं. या काळात देशात खूप अत्याचार आणि दडपशाही झाली. देशात सामूहिक हत्या झाल्या, रक्ताचे पाट वाहत होते. त्या काळात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. 1991 मध्ये त्यांचा पाडाव करण्यात आला. त्यांना देशातून पळून जावं लागलं. ते सध्या राजकीय आश्रय घेऊन झिम्बाब्वेमध्ये राहत आहे. (विकी कॉमन्स)

जाहिरात
0608

सुलतान अली केशमंद हे 81-88 आणि 89-90 मध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते. मात्र, जेव्हा त्यांचा सत्तापालट झाला तेव्हा ते ब्रिटनला पळून गेले आणि स्वतःचे प्राण वाचवले. आजही ते तिथेच राहतात.

जाहिरात
0708

इक्वेडोरचे वकील, शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती जॉर्ज जमील महौद सध्या पनामामध्ये निर्वासित जीवन जगत आहेत. 1988 ते 2000 पर्यंत ते देशाचे राष्ट्रपती होते. त्यांच्या काळात इक्वेडोर आर्थिक संकटात अकडला होता. जनजीवन अत्यंत कठीण झाले. त्यांच्या चुकीच्या निर्णयांनी देशाला या स्थितीत ढकलले, असे मानले जाते. संपूर्ण देशात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली. आठवडाभराच्या सततच्या निदर्शनांनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. सैन्याने सत्ता काबीज केली. जमीलला देश सोडून शेजारच्या देशात पळून जावे लागले.(wiki commons)

जाहिरात
0808

2021 मध्ये तालिबानची सत्ता येईपर्यंत मोहम्मद अशरफ घनी हे देशाचे अध्यक्ष होते. ते एक स्थिर नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. पण तालिबानने ज्या प्रकारे तिथले सरकार पाडले. त्यानंतर घनींनाही तेथून विमानाने कुटुंबासह पळून जावे लागले. सध्या ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेऊन राहत आहे. गेल्या 10 वर्षांत, 15 हून अधिक राज्यकर्त्यांना त्यांच्या देशाच्या परिस्थितीमुळे किंवा सत्ता उलथून टाकल्यामुळे देश सोडून पळून जावे लागले आहे किंवा इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. (विकी कॉमन्स)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या