JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / Netaji Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'या' गोष्टी खूप कमी लोकांना आहे माहीत

Netaji Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'या' गोष्टी खूप कमी लोकांना आहे माहीत

Netaji Subhash Chandra Bose Jayanti : बहुतेक लोकांना नेताजी सुभाषचंद्र बोस एक शूर योद्धा आणि स्वातंत्र्यलढ्यातील एक अद्भुत नेता होते, हे माहित आहे. मात्र, त्यापलीकडे जाऊन त्यांच्यात आध्यात्मिक पैलू देखील होते, हे खूप कमी लोकांना माहित आहे.

0108

नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची एक बाजू राजकारण आणि स्वातंत्र्यलढ्याची असेल तर दुसरी बाजू अध्यात्म होती. ते रोज योगा करत असे. त्यांच्या जीवनावर पौगंडावस्थेपासून आध्यात्मिक विचारांचा प्रभाव होता. आझाद हिंद फौजेच्या स्थापनेदरम्यान ते जपानमध्ये असतानाही ते दररोज त्यांच्या खोलीत योगासने आणि ध्यान करत असत. त्यावेळी त्यांना एकांतात राहायला आवडायचे. वास्तविक, ते नेहमीच लोकांच्या गरांड्यात असायचे मात्र, रात्री जेव्हा एकांत मिळायचा ते ध्यानात रमून जायचे.

जाहिरात
0208

सुभाषचंद्र बोस नेहमी सोबत ठेवत असलेल्या गोष्टींमध्ये भगवद्गीता देखील होती. जे ती रोज वाचत असे. यामुळे त्यांना शांती आणि शक्ती मिळत असे. त्यानुसार त्यांना काम करण्याची आवड होती.

जाहिरात
0308

रात्रीच्या जेवणानंतर ते सहसा विश्रांती घेत. यावेळी ते फार कमी लोकांना भेटत. जरी कोणी आले तरी ते बहुतेकदा शांत दिसायचे. त्यावेळी ते फार कमी बोलायचे.

जाहिरात
0408

नेताजी रात्री उशीरापर्यंत जागे असायचे. साधारणपणे रोज रात्री 02-03 वाजता झोपायला जायचे. यानंतरही सकाळी ते खूप फ्रेश दिसत. झोपताना ते दिवसभराच्या कामाचा आध्यात्मिक आढावा घेत असत.

जाहिरात
0508

आझाद हिंद फौजेच्या स्थापनेच्या वेळी नेताजींबद्दल लोक म्हणायचे की ते सामान्य सैनिकांसोबत बसायचे आणि तेच साधे जेवण खात. कधी खास व्यक्ती त्यांना भेटायला यायची, तरच त्यांच्यासोबत वेगळे जेवण करायचे.

जाहिरात
0608

त्यांना चहा-कॉफीची खूप आवड होती. कोलकात्यातील त्यांच्या घरी असताना ते दिवसातून 20-25 कप चहा घेत असत. ते सिगारेट देखील ओढत होते. कधीकधी तणावाच्या क्षणी, लोकांनी त्यांना धुम्रपान करताना पाहिले आहे. त्यांचा संयम क्वचितच ढळलेला पाहायला मिळायचा, असे त्यांच्याबरोबर राहणारे लोक सांगतात.

जाहिरात
0708

त्यांना वाचनाची खूप आवड होती. तुरुंगात असताना ते विविध प्रकारची पुस्तके वाचत असत. त्यांना सर्वच विषयात रस होता. विशेषतः, जगभरात काय चालले आहे हे जाणून घेण्यात त्याला खूप रस होता. ते जेवढे वाचायचे तेवढेच लिहायचे आणि सर्व विषयांवर विश्लेषणात्मक लेखही लिहायचे. देशविदेशातील अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले.

जाहिरात
0808

सुभाषचंद्र बोस हे माँ कालीचे भक्त होते. त्यांचा तंत्रसाधनेच्या सामर्थ्यावर विश्वास होता असेही म्हणतात. म्यानमारमधील मंडला तुरुंगात असताना त्यांनी तंत्रमंत्राशी संबंधित अनेक पुस्तकेही वाचली होती. लिओनार्ड गार्डन त्यांच्या पुस्तकात म्हणतात की सुभाष यांनी धर्मावर कधीही कोणतेही विधान केले नसले तरी हिंदू धर्म त्यांच्यासाठी भारतीयत्वाचा भाग होता. गार्डनने या पुस्तकात लिहिले की, सुभाषची आई दुर्गा आणि कालीची भक्त होती, त्यामुळे सुभाष यांच्यावरही याचा प्रभाव झाला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या