JOIN US
मराठी बातम्या / Explainer / Solar Energy | सौरऊर्जा आता रात्रीही वीज निर्माण करणार! नवीन तंत्रज्ञानाने उर्जाक्षेत्रात क्राती येणार?

Solar Energy | सौरऊर्जा आता रात्रीही वीज निर्माण करणार! नवीन तंत्रज्ञानाने उर्जाक्षेत्रात क्राती येणार?

सौरऊर्जा (Solar Energy) अक्षय ऊर्जा किंवा स्वच्छ ऊर्जेचा स्त्रोत मानला जातो. पण, यात अडचण अशी आहे की ती रात्री उपलब्ध होत नाही आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा साठवणे हे खूप खर्चिक काम आहे. इस्रायलमधील एका तंत्राद्वारे त्याचे समाधान शोधण्यात आले आहे. या तंत्रात दिवसा होणारी सौरऊर्जेची बचत होऊन ती रात्री वापरता येते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर : हवामानातील बदल (Climate Change) रोखण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर थांबवणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी जगाला स्वच्छ किंवा हरित ऊर्जेच्या (Clean Energy) वापरासाठी योग्य पर्याय उपलब्ध करुन द्यावे लागणार आहेत. सध्या जगभरात सौरऊर्जेचा (Solar Energy) वापर झपाट्याने वाढत आहे. यात अडचण अशी आहे की ती साठवून ठेवता येत नसल्याने रात्री काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होतो. इस्रायलमधील एका नवीन तंत्रज्ञानाने या समस्येवर उपाय शोधला आहे. परिणामी आता रात्रीही सौरउर्जा वापरता येऊ शकते. काय होती अडचण? इस्रायलचा दक्षिणेकडील प्रदेश हा एक खडकाळ वाळवंट आहे, ज्यामध्ये मुबलक सौर पॅनेल बसवलेले असून सूर्यापासून येणाऱ्या वीज पुरवठ्याचा एकमेव स्त्रोत आहे. मात्र, सूर्यास्त झाला की, ग्रिडला जीवाश्म इंधनाद्वारे उर्जा निर्माण करण्यावर अवलंबून राहावे लागते. मोठ्या समस्येपासून मुक्त सौर आणि वाऱ्यापासून मिळणारी शाश्वत ऊर्जा साठवणे पूर्णपणे अशक्य नाही. मात्र, यासाठी अतिरिक्त खर्च आहे. हा सर्वात मोठा अडथळा आहे ज्यामुळे जग जीवाश्म इंधनापासून मुक्त होऊ शकत नाही. परिणामी प्रदूषणामुळे होणारी जागतिक तापमानवाढ थांबवू शकत नाही. या कारणास्तव, वीज प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा वापरण्यात देखील समस्या आहे. सूर्यास्तानंतरही उत्पादन इस्रायलमध्ये लाल समुद्राजवळ किबुत्झ याहेल नावाचा समुदाय राहतो. या समाजाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे, ज्यामध्ये सौरऊर्जा स्वस्तात साठवून ठेवता येते ज्यातून रात्रीच्या वेळीही ऊर्जा निर्माण करता येते. या तंत्रात दिवसा अतिरिक्त सौर ऊर्जा साठवून ती रात्री वापरली जाते. सिंगापूर शहरातील एका मेट्रो स्टेशनला धोबीघाट नाव का दिलं? हे तंत्रज्ञान कसे कार्य करते? या तंत्रज्ञानामध्ये सौर पॅनेलमधून मिळालेली अतिरिक्त ऊर्जा वापरुन एका प्रणालीद्वारे पाण्याचे वाफेत रुपांतर करुन जमिनीखालील टाक्यांमध्ये साठवली जाते. जेव्हा सूर्यास्तानंतर प्लांट बंद होतो, तेव्हा ही हवा टर्बाइनला उर्जा देण्यासाठी आणि वीज निर्माण करण्यासाठी वापरली जाते. दुसऱ्या दिवशी त्याच चक्राची पुनरावृत्ती होते. ग्रीन एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स याहेलचे बिझनेस मॅनेजर योसी एमील यांनी सांगितले की आता इतर किबुतजीम देखील हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढे येत आहेत. हा प्रयोग या प्रदेशासाठी नक्कीच ग्रीन एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स ठरू शकतो. ऑगविंड एनर्जी या तेल अवीव स्थित आधारित कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे, ज्याचे मार्केट कॅपिटल 3.86 अब्ज डॉलर आहे. ब्रह्मचारी असलेल्या महर्षी वात्स्यायन यांनी ‘कामसूत्र’ सारखा ग्रंथ कसा लिहिला? कमी खर्चात उर्जेची साठवण या प्रक्रियेसाठी कंडेन्स्ड हवा आणि पाणी साठवण्यासाठी भरपूर क्षेत्र लागते. मात्र, कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचे उत्पादन, जे एक पातळ स्टील टाकीत आहे, विशेष पॉलिमरच्या आवरणाची आहे. यामुळे उर्जा साठण्यासाठी येणारा खर्च कमी होतो. याशिवाय इतर अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानावरही काम सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या