JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / Explainer / विलक्षण बुद्धिमत्ता आणि नेतृत्वासाठी ओळखले जाणारे CDS रावत यांच्या पिढ्यानपिढ्या लष्करात

विलक्षण बुद्धिमत्ता आणि नेतृत्वासाठी ओळखले जाणारे CDS रावत यांच्या पिढ्यानपिढ्या लष्करात

भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमधील कुन्नूर येथे भीषण अपघात झाला आहे. जनरल रावत (वय 63) हे उत्तराखंडमधील अशा कुटुंबातून येतात ज्यांच्या पिढ्यानपिढ्या सैन्यात भरती होत आल्या आहेत.

0106

जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह एमआय 17 सीरिजच्या हेलिकॉप्टरवर होते, जे उटीजवळ क्रॅश झाले. जनरल रावत यांची लष्करी कारकीर्द चमकदार आहे. यामुळेच ते देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झाले.

जाहिरात
0206

31 डिसेंबर 2019 रोजी, लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, जनरल रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले. रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत लष्करप्रमुखपद भूषवले होते.

जाहिरात
0306

जनरल रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील चौहान राजपूत कुटुंबात झाला. त्यांचे वडीलही लष्करात अधिकारी होते. खरे तर रावत कुटुंबीयांची लष्करात भरती होण्याची परंपरा आहे. त्यांनी 1978 मध्ये 11 व्या गोरखा रायफल्सच्या 5 व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

जाहिरात
0406

रावत यांचे शालेय शिक्षण डेहराडूनमधील कँब्रियन हॉल स्कूल, शिमला येथील सेंट एडवर्ड स्कूल आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनमधून झाले. यानंतरही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. त्यांनी एमफिल आणि नंतर पीएचडी केली. 2011 मध्ये त्यांना चौधरी चरणसिंग मेरठ येथून लष्करी-मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीजवरील संशोधनासाठी पीएचडी प्रदान करण्यात आली.

जाहिरात
0506

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक प्रकारच्या लष्करी कारवाया आणि कारवाईत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता. प्रत्येकवेळी त्यांचे शौर्य, समजूतदारपणा आणि लष्करी रणनीती सर्वांनी मान्य केली. यामुळेच त्यांची सैन्यात एका पदावरून दुसऱ्या पदावर प्रगती होत राहिली.

जाहिरात
0606

जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका या मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील आहेत. रावत यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी कृतिका हिचे मुंबईत लग्न झाले आहे तर धाकटी मुलगी तारिणी अजूनही शिकत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या