JOIN US
मराठी बातम्या / Explainer / काँग्रेससाठी अनलकी ठरलेले असतानाही प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी का होतोय प्रयत्न?

काँग्रेससाठी अनलकी ठरलेले असतानाही प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी का होतोय प्रयत्न?

Prashant Kishor: प्रशांत किशोर काँग्रेससोबत आपली नवी राजकीय खेळी सुरू करणार आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या प्रवेशाची रूपरेषा ठरलेली नाही. मात्र, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा पहिल्यांदाच होत नाही, तर यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा सुरु होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 एप्रिल : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार या बातम्यांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने मंगळवारी प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी दीर्घ सल्लामसलत केल्यानंतर सांगितले की किशोर यांना ‘विशेषाधिकार प्राप्त कार्य गट 2024’ चा भाग बनून पक्षात सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. दरम्यान, प्रशांत किशोर यांना घेण्यासाठी काँग्रेस इतकी प्रयत्न करताना का दिसत आहे? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकवावं लागेल. पीके यांच्या काँग्रेससोबतच्या जुन्या नात्यात कटुता प्रशांत किशोर यांची राहुल गांधींसोबतची पहिली भेट 2015 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी समारंभात झाली होती, जी खुद्द पीके यांनी सांगितली होती. यादरम्यान, दोघांमध्ये जास्त वेळ चर्चा झाली नाही. परंतु, राहुल गांधींनी प्रशांत किशोर यांना उत्तर प्रदेशबद्दल सल्ला विचारला होता. सोबतच 2017 च्या निवडणुकीत काँग्रेससाठी काम करण्यास सांगितले होते. पीके यांनी त्यांच्या टीमशी सल्लामसलत करून 2017 मध्ये काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीवर काम केले आणि पंजाबची जबाबदारीही घेतली. प्रशांत किशोर यांना 2017 च्या यूपी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा वापरायचा होता. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतला. यानंतर पीके यांच्या सांगण्यावरून काँग्रेसने सपासोबत युती करून निवडणूक लढवली. पण, निकाल खूपच वाईट लागला. आधीपेक्षाही काँग्रेसचा मोठा पराभव झाला. उलट पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सत्तेत आली. पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयाचे श्रेय अमरिंदर सिंग यांना जाते. उत्तर प्रदेशातील पीकेच्या राजकीय प्रयोगाची कटुता अजूनही काँग्रेसमध्ये आहे, त्याबाबत त्यावेळीही पक्षात प्रश्न उपस्थित झाले होते आणि आता पीकेबाबत जेव्हा चर्चा होते, तेव्हा 2017 च्या राजकीय भवितव्याची आठवण नक्कीच होते. पंजाब निवडणुकीत किशोर यांनी साथ सोडली पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी निवडणुकीची रणनीती बनवण्याचे मान्य केले होते. पीके यांनी पंजाबमध्ये काँग्रेसची कमानही हाती घेतली होती. अमरिंदर सिंग यांनी त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. पण, काही दिवसांनी पीके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन हात वर केले. पंजाब काँग्रेसची सध्याची स्थिती पाहता प्रशांत किशोर यांनी कॅप्टनचे सल्लागार म्हणून काम करण्यास नकार दिला होता. काँग्रेसमधील गटबाजीमुळे पीके आपली रणनीती राबवू शकले नाहीत आणि निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष सोडला. एवढेच नाही तर त्यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना चंदीगडला बोलावले होते. विद्यमान आमदारांपैकी कोणते आमदार पुन्हा तिकीट देण्यास पात्र आहेत, याचा अहवाल तयार केला होता. त्यानंतर काँग्रेस आमदारांमध्ये पीके यांच्याविरोधात प्रचंड नाराजी पसरली होती. यानंतर प्रशांत किशोर पंजाब काँग्रेसच्या नेत्यांपासून दोन हाथ दूर राहिले.

BREAKING : प्रशांत किशोर काँग्रेसच्या उंबरठ्यावरून माघारी परतले, सोनिया गांधींची ऑफर नाकारली

संबंधित बातम्या

जेडीयूसोबत फार पुढे जाऊ शकले नाही 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक रणनीती बनवण्याचे काम प्रशांत किशोर यांनी केले होते, त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पीके यांनी भाजपच्या 2014 च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच भाजपशी त्यांचे संबंध बिघडले. यानंतर बिहार निवडणुकीदरम्यान ते जेडीयूच्या जवळ आले आणि 2015 नंतर सक्रियपणे राजकारणात पाऊल ठेवले. 2018 मध्ये, प्रशांत किशोर यांनी पूर्ण स्थिती आणि प्रभावासह JDU मध्ये प्रवेश केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना त्यांच्या उजव्या बाजूला बसवून पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले होते. JDU मध्ये आपल्या समावेशाची घोषणा करताना, नितीश कुमार यांनी किशोर यांना पक्षाचे “भविष्य” सांगितले होते. जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर महिनाभरातच प्रशांत किशोर यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवण्यात आल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. लालन सिंग आणि आरसीपी सिंग यांच्यासारख्या बड्या आणि विश्वासू नेत्यांना बाजूला सारून नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांची निवड केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूमध्ये जागावाटप करण्यात पीके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, एवढे होऊनही प्रशांत किशोर यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीची परिस्थिती कायम होती. प्रशांत किशोर यांच्यासाठी एक कठीण परिस्थिती समोर आली जेव्हा त्यांची कंपनी iPAC ने जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची निवडणूक रणनीती तयार करण्याची जबाबदारी घेतली. यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आम आदमी पक्षाची रणनीती बनवण्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पीके आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत नितीशकुमार यांच्यामधील अंतर वाढू लागले. दरम्यान, पीकेने सीएए आणि एनआरसीवर जेडीयूची भूमिका सोडून ट्विट केले, ज्यामध्ये प्रशांत किशोर यांनी एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये ते नितीश कुमारांवर टीका करताना दिसत होते. प्रशांत किशोर यांच्या या ट्विटवर नितीश कुमार यांनीही प्रतिक्रिया देत, अमित शाह यांच्या सांगण्यावरून त्यांना पक्षात समाविष्ट करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र, आता ते इतर पक्षांसाठी रणनीती बनवत आहेत. त्यांना इतरत्र जाण्याची महत्त्वाकांक्षा आहे. ते कुठेही जाऊ शकतात. प्रत्युत्तरात प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना खोटारडे म्हटले आणि जेडीयूशी संबंध तोडले. यानंतर त्यांनी बिहारमध्ये नवा राजकीय पर्याय निर्माण करण्याची कसरत सुरू केली. मात्र, काँग्रेसमध्ये जाण्यासाठी हातपाय झटकतानाही दिसले. काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न प्रशांत किशोर यांना सामावून घेण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून कसरत सुरू आहे. देशात भाजपपेक्षा लोकशाही धर्मनिरपेक्ष शक्ती अधिक मजबूत उभी राहावी आणि ती ताकद फक्त काँग्रेसच असू शकते, अशी पीकेची इच्छा आहे. कारण, हा एकमेव पक्ष आहे जो आपल्या सर्व कमकुवतपणा आणि पराभवानंतरही केवळ अखिल भारतीय पातळीवर अस्तित्वात आहे. समृद्ध वैचारिक वारसा असलेली दीर्घ राजकीय परंपरा लोकांना भाजपला लोकशाही पर्याय देऊ शकते, असं किशोर यांना वाटतं. प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये कोणते स्थान आणि भूमिका द्यायची याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत नाही. मात्र, आता चर्चांना सध्या तरी पूर्णविराम लागला आहे. काँग्रेसला प्रशांत किशोर यांची गरज का पडली? 2024 मध्ये पक्षाला पुनरागमन करता आले नाही, तर सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे संकट आणखी वाढेल. अशा परिस्थितीत त्यांना प्रशांत किशोरमध्ये ‘जादूगार’ दिसू लागला आहे. प्रशांत किशोर यांचे अनेक गैर-भाजप पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत, ज्याद्वारे ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाआघाडी तयार करण्यास मदत करू शकतात. सध्या काँग्रेस आपल्या स्तरावरून विरोधकांना एकत्र करण्यात असमर्थ ठरत आहे. देशाची नाडी समजून घेऊन त्यानुसार पक्षाची रणनीती ठरवणाऱ्या अशा ‘पूर्णवेळ’ नेत्यांची पक्षात आता उणीव आहे, ही एक मोठी समस्या काँग्रेसमध्येही दिसून येत आहे. पक्ष आता दुफळीत विभागला गेला असून नेते ट्विटरच्या माध्यमातून राजकारण करण्यात अधिक वेळ घालवत आहेत. अशा परिस्थितीत तिला प्रशांत किशोर सारख्या व्यक्तीची नितांत गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या