मुंबई, 6 फेब्रुवारी : चीनमधील बीजिंग शहरात (olympic games in china) हिवाळी ऑलिम्पिकला (Winter olympic) सुरुवात झाली आहे. हे ऑलिम्पिक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. कोरोनाच्या काळात याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी जगातील अनेक देशांनी त्यावर राजनैतिक बहिष्कार टाकला आहे. अशा स्थितीत ऑलिम्पिक चिन्हावरुन सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. त्याचा अर्थ काय आणि त्याचे वेगवेगळे रंग (meaning of olympic rings) का आहेत? यावरुन तर्कवितर्क सुरू झाले आहेत. वास्तविक, ऑलिम्पिक चिन्हात पाच रिंग असून त्यांचे रंग वेगवेगळे असतात. ऑलिम्पिक चिन्ह ऑलिम्पिक चार्टरच्या आठ नियमानुसार ऑलिंपिक चळवळीचा संदर्भ देते. या पाचही रिंग एकाच आकाराच्या असून त्यात निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगांचा समावेश आहे. हे 1913 मध्ये तयार करण्यात आले होते. सर्वात आधी पियर डी कौबर्टिन यांनी हे डिझाइन केले होते. त्यावेळी ध्वजाच्या पांढऱ्या पार्श्वभूमीत हे 5 रंग मिसळून सर्व देशांचे ध्वज एकत्र करण्यात आले होते. त्याच्या निर्मात्याने त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक ध्वजाचे रंग या पाच रंगांमध्ये बदलले आणि त्याला एकतेसाठी असा आकार आणि रंग दिला असे अनेक अहवालांमध्ये नमूद केले आहे. पहिल्या महायुद्धामुळे 1914 मध्ये ऑलिम्पिक काँग्रेस रद्द करण्यात आली होती. परंतु, प्रतीक आणि ध्वज स्वीकारण्यात आला आणि 1920 मध्ये बेल्जियन ऑलिंपिक दरम्यान प्रथम वापरण्यात आला. IND vs WI : एक वर्षापूर्वी होती करियर संपण्याची भीती, आता टीम इंडियाकडून पदार्पण रिंग्सचा एक नवीन अर्थ काही वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या रिंग्सचा एक नवीन अर्थ लावला आणि या रिंगांना ‘खंडांचे प्रतीक’ म्हणून घेण्याचे आवाहन केले. जरी एखादा विशिष्ट रंग कोणत्याही खंडाशी संबंधित नसला तरी, 1951 पूर्वी ऑलिम्पिकच्या अधिकृत पुस्तिकेत असे नमूद केले होते की निळा युरोप, पिवळा आशिया, आफ्रिकेसाठी काळा, ऑस्ट्रेलिया-ओशनियासाठी हिरवा आणि अमेरिकेसाठी लाल रंग दर्शवितो.
हिवाळी ऑलिम्पिक बहिष्कार सध्या चीनच्या बीजिंग शहरात यंदाच्या हिवाळी ऑलिम्पिकची सुरुवात झाली आहे. अमेरिकेने सर्वप्रथम राजनैतिक बहिष्काराची घोषणा केली. यानंतर ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, जपान, नेदरलँड, भारत आणि न्यूझीलंडनेही बहिष्कार टाकला आहे. मात्र, पाश्चिमात्य देशांच्या मुत्सद्दी बहिष्कारामुळे नाराज झालेल्या चीनने त्यांना मोठी किंमत मोजण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच ड्रॅगनने अमेरिकेवर यात कट रचल्याचा आरोप केला आहे.