मिठाचे किती प्रकार आहेत आणि त्यात किती रंग येतात हे जर कोणी तुम्हाला विचारले तर तुम्ही मिठाचे दोनतीन प्रकार सांगू शकता. पण, त्यानंतर तुम्हाला कल्पनाही नसेल की आपण रोज जे मीठ खातो ते 12 प्रकारचे असते. आणि त्यांचे रंग देखील भिन्न आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या
मीठ हा आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहे. मीठाशिवाय कदाचितच कोणी अन्नग्रहण करत असेल. आरोग्यासाठी देखील मीठ खूप उपयुक्त आहे.
मीठाची चव ही आपल्या पाच मूलभूत चवींपैकी एक आहे (खारट, गोड, तिखट, आंबट आणि आळणी). पण सर्व मीठ एकसारखे नाही. मीठामध्ये या 12 पद्धतींचा समावेश आहे.
टेबल मीठ: हे सर्वात सामान्य मीठ आहे. हे जमिनीखाली सापडणाऱ्या क्षारयुक्त घटकांपासून बनवले जाते. ते काढल्यानंतर, त्यातील अशुद्धता आणि खनिजे साफ केली जातात. टेबल सॉल्टमध्ये आयोडीन मिळसले जाते. हे गलगंडासाठी योग्य उपचार मानले जाते.
कोशेर सॉल्ट: कोशेरिंग सॉल्ट, ज्याला अमेरिकेत कोशेर सॉल्ट देखील म्हणतात. त्याचे दाणे टेबल मीठापेक्षा जाड आणि थराचे असतात. यामुळे ते मांसावर शिंपडण्यासाठी उत्कृष्ट मानले जाते. तसेच ते वेगाने विरघळते, त्यामुळे कोणत्याही अन्नामध्ये त्याचा वापर चांगला मानला जातो.
सागरी मीठ: हे समुद्राच्या पाण्यापासून मिळवले जाते. हे मीठ जास्तकरुन अनरिफाइंड असते आणि टेबल मीठाच्या तुलनेत मोठे दाणे असतात. याव्यतिरिक्त त्यात जस्त, पोटॅशियम आणि लोह सारखी खनिजे देखील असू शकतात. त्यामुळे त्याची टेस्ट थोडी वेगळी होते.
हिमालयीन पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट: हे मीठ जगातील सर्वात स्वच्छ मीठ मानले जाते. जे हाताने खोदून मिळवले जाते. पाकिस्तानमधील हिमालय पर्वतरांगातील खेवडा मीठ खाणीतून हे मिळवले जाते. त्याचा रंग फिकट पांढऱ्यापासून गुलाबीपर्यंत अनेक छटांमध्ये बदलतो. खनिजांच्या बाबतीत ते खूप चांगले आहे. यामध्ये शरीरासाठी फायदेशीर 84 खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. स्पॉ इत्यादींमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
सेल्टिक समुद्री मीठ: फ्रेंचमध्ये 'सेल ग्रिस' असेही म्हणतात. म्हणजे राखाडी मीठ. फ्रान्सच्या किनार्यावरील भरती-ओहोटीतून सेल्टिक समुद्री मीठ काढले जाते. ते किंचित राखाडी रंगाचे असते. हे मासे आणि मांस शिजवण्यासाठी चांगले मानले जाते.
Fleur de sel: याचा शाब्दिक अर्थ 'मीठाचे फूल' असा होतो. फ्रान्समधील ब्रिटनी नावाच्या ठिकाणच्या भरतीच्या तलावातून ते काढले जाते. हे मीठ काढण्याची प्रक्रिया केवळ सूर्यप्रकाशात, गरम दिवस आणि वारा वाहत असताना केली जाते. हे पारंपारिक लाकडी वायपिंगच्या मदतीने काढले जाते. या किचकट प्रक्रियेमुळे हे मीठ खूप महाग मिळते. त्यात असलेल्या ओलाव्यामुळे याला थोडासा निळा रंग येतो. हे मांस, सीफूड, भाज्या आणि चॉकलेट आणि कारमेल इत्यादींमध्ये वापरण्यासाठी सर्वात योग्य मानले जाते.
काळे मीठ: हे देखील फक्त हिमालयीन प्रदेशात आढळते. हे कोळसा, औषधी वनस्पती, बिया आणि साल असलेल्या जारमध्ये पॅक केले जाते. त्यानंतर ते चार तास भट्टीत ठेवले जाते. त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप चांगले असते. हे पचनासाठी देखील चांगले मानले जाते. जे शाकाहारी लोक अंडी खात नाहीत, त्यांनी त्याचा वापर जेवणात केला तर त्यांनाही अंड्याची चव येते.
फ्लेक सॉल्ट: हे बाष्पीभवनाद्वारे समुद्रातून काढले जाते. हे पातळ थर असलेले, एकसमान नसलेले कण आणि पांढरे असते. पण त्यात खनिजांचे प्रमाण कमी असते. हे मांस इत्यादीसाठी फिनिशिंग मीठ म्हणून वापरले जाते.
ब्लॅक हवाईयन मीठ: ब्लॅक लावा सॉल्ट म्हणूनही ओळखले जाते. याला समुद्रातूनही काढले जाते. सक्रिय कोळशाच्या प्रमाणामुळे देखील त्याचा रंग गडद काळा असतो. त्याचे दोणे असमान असतात, ते डुकराचे मांस आणि सीफूड सारख्या अन्नाचे फिनिशिंग मीठ म्हणून वापरले जाते.
रेड हवाईयन मीठ: याला अलाया मीठ असेही म्हणतात. हे अनरिफाइंड मीठ आहे. त्याचा हलका लाल रंग ज्वालामुखीतील लोखंडी खनिजे आणि अलाया चिकणमातीमुळे आहे. याचा वापर खाण्यासाठी तसेच अनेक पारंपारिक कामांमध्ये केला जातो.
स्मोक्ड सॉल्ट: या मीठाला दोन आठवडे लाकडाच्या आगीवर हळूहळू धूर दिला जातो. त्यामुळे अन्नात टाकल्यावर याला स्मोकी टेस्ट येते. हे मांस आणि बटाटे शिजवण्यासाठी वापरले जाते. आणि वेगवेगळ्या लाकडांच्या वापरामुळे मीठाची चव देखील बदलते.
पिकलिंग सॉल्ट: याचा उपयोग अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी केला जातो. त्यात आयोडीन किंवा समुद्री मीठासारखे खनिजे नसतात, ज्यामुळे दीर्घकाळ साठवलेल्या अन्नाला कोणतीही हानी होत नाही.