हवामान खाते रंगांच्या माध्यमातून इशारे (Warnings Alerts) कसे देतात? अॅलर्ट सिस्टीम काय आहे? जगभरातील देश कोणती प्रणाली वापरतात. भारतीय हवामान विभागाकडून दिले जाणारे Yellow, Orange आणि Red अलर्ट काय आहेत?
राजधानी दिल्लीत उष्णतेमुळे लोकांचे हाल होत असले तरी, मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. येत्या पाच 5 दिवसासाठी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पावसाची (monsoon Season) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. हवामान खाते वेळोवेळी विविध प्रकारचे हवामान इशारे जारी करत असते. या सूचनांचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? रंगांवर आधारित अलर्ट (Alert) कसे जारी केले जातात? चला समजून घेऊ.
रंगांच्या आधारे अलर्ट जारी करणे सुमारे 12-13 वर्षांपूर्वी सुरू झाले. ही प्रणाली जगातील बहुतेक हवामान खात्यांनी स्वीकारली. ही प्रणाली चेतावणी चिन्हे समजण्यास सोपी बनवते आणि रंगांवर आधारित आहे, ज्यामुळे जगभरात त्याचप्रमाणे अर्थ लावले जाण्याची शक्यता वाढते. कोणत्या इशाऱ्याचा अर्थ काय ते जाणून घेऊया.
यलो अलर्ट - सतर्क रहा (Yellow Alert) : हवामानानुसार, हा अलर्ट किंवा इशारा म्हणजे आपण आपल्या क्षेत्राबद्दल किंवा दिनचर्याबद्दल सतर्क असले पाहिजे. काही खबरदारी घ्यायची असते. पिवळा अलर्ट जारी करण्याचा उद्देश लोकांना सतर्क करणे हा आहे. यानुसार, तुम्हाला तात्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे.
ऑरेंज अलर्ट - तयार रहा (Orange Alert) : जेव्हा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला तेव्हा याचा अर्थ असा होतो की हवामानाने आता अधिक खराब हवामानासाठी तयार रहावे अशी मागणी केली आहे. जेव्हा हवामान असे वळण घेते, ज्याचा परिणाम जनजीवनावर होऊ शकतो, तेव्हा हा अलर्ट जारी केला जातो. खराब हवामानामुळे तुम्ही तुमच्या प्रवासासाठी, कामासाठी किंवा शाळेतील मुलांच्या प्रवासासाठी तयार राहा.
रेड अलर्ट - कृतीची वेळ (Red Alert) : अत्यंत गंभीर परिस्थितीत रेड अलर्ट जारी केला जातो, म्हणून तो दुर्मिळ आहे. तरीही, रेड अलर्टचा अर्थ असा आहे की जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेची वेळ आली आहे. अनेकदा या अलर्टनंतर डेंजर झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी नेले जाते. हवामानानुसार सुरक्षा व्यवस्था केली जाते, जसे की उन्हाळ्याच्या काळात रेड अलर्ट जारी झाल्यास, घराबाहेर न पडण्याची आणि आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले जातात. तसेच हा इशारा पावसाळ्यात जारी केल्यास पूर, वादळ किंवा नुकसानकारक पावसाचा इशारा असल्याचे स्पष्ट संकेत आहे, त्यामुळे आवश्यक ती व्यवस्था करा. रेड अलर्टच्या वेळी सामान्य जीवनाला असलेला धोका लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक, शालेय कामकाज यासारखे नियमित काम बंद केले जाऊ शकते.
रंगांच्या आधारे अलर्ट किंवा इशारे देण्याच्या यंत्रणेमुळे अनेक प्रकारच्या आपत्तींमध्ये पूर्वीपेक्षा अधिक बचाव शक्य झाला आहे. ही प्रणाली 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि यूकेच्या हवामान खात्यानंतर भारतासह अनेक देशांनी ही चेतावणी प्रणाली स्वीकारली. कलर कोड वॉर्निंग सिस्टीममध्ये, हिरव्या रंगाच्या कोडचा अर्थ सर्व ठीक आहे, म्हणून तो इशारा म्हणून वापरला जात नाही. भारताच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय हवामान विभाग नियमितपणे आपल्या वेबसाइटवर या रंग कोडद्वारे हवामान परिस्थिती आणि अंदाज देते. या कलर कोड सिस्टीमनुसार तुम्ही तुमच्या भागातील हवामानाची स्थिती सहज समजू शकता.