JOIN US
मराठी बातम्या / Explainer / आता पूर्वीसारखे आकाशात तारे का दिसत नाही! काय आहे यामागचं कारण?

आता पूर्वीसारखे आकाशात तारे का दिसत नाही! काय आहे यामागचं कारण?

आजकाल आकाशात पूर्वीसारखे तारे दिसत नाहीत. पूर्वी गावातून आकाशात अनेक तारे दिसत होते, अशी तक्रार करणारे लोक तुम्ही अनेकदा पाहिले असतील. यामागचे कारण काय आहे?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 फेब्रुवारी : रात्र (night) झाली की आकाशात (sky) चंद्र आणि तारे (moon and stars) दिसू लागतात; पण गेल्या काही वर्षांत आकाशात तारे दिसण्याचं प्रमाण कमी झाल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. तारे न दिसण्याचं किंवा कमी दिसण्याचं कारण (reason) शहरांमध्ये असणारे दिवे (lights in the cities) आहेत. वाचून धक्का बसला ना? चला यामागचं कारण जाणून घेऊ. गेल्या काही वर्षांत रात्रीच्या वेळी आकाशात तारे दिसणं कमी झाल्याचं किंवा काही ठिकाणी तर ते अजिबातच दिसत नसल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. पूर्वी जिथे रात्रीचं आकाश ताऱ्यांनी भरलेलं असायचं, तसं आता नाही. असं होण्याचं कारण अनेकदा प्रदूषण (Pollution) मानलं जातं. परंतु रात्री तारे न दिसण्याचं किंवा कमी दिसण्याचं कारण शहरांमध्ये असणारे दिवे आहेत. होय, हे खरं आहे. Light Pollution अर्थात प्रकाश प्रदूषणामुळे असं घडत असल्याचं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. डीडब्ल्यूच्या एका रिपोर्टनुसार, आता जगामध्ये फक्त 20 टक्के नागरिकच असे आहेत, जे ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहू शकतात, असं शास्त्रज्ञ म्हणतात. इतरांना तो अनुभव घेता येत नाही. वाढत्या कृत्रिम प्रकाशामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. शहरातली घरं, रस्ते, परिसर दिव्यांनी उजळून निघतो. त्यामुळे दर वर्षी कृत्रिम प्रकाश 2.2 टक्क्यांनी वाढत आहे. यामुळे अंधार तर कमी होत आहेच; पण सतत वाढत जाणाऱ्या प्रकाशामुळे आपल्या इको सिस्टीममध्येही मोठा फरक पडत आहे. याचा परिणाम पक्ष्यांपासून झाडांपर्यंतच्या अनेक गोष्टींवर होत असल्याचं आढळून येत आहे. अंतराळात 70 हजार अब्ज तारे आहेत. त्यामध्ये अनेक रहस्यं दडलेली आहेत; पण कृत्रिम प्रकाशामुळे ते दिसण्याचं प्रमाण पृथ्वीवर कमी झालं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, शहरांमध्ये वाढत्या कृत्रिम प्रकाशामुळे आकाशातला अंधार संपला आहे. आता रात्रीच्या वेळी दिव्यांमुळे शहरांमध्ये असणारा प्रकाश हा आकाशातल्या प्रकाशाच्या 40 पट असतो. रात्रीच्या वेळी आकाशातले तारे बघता यावेत, यासाठी काही जण शहरापासून दूरवर डोंगरावर जाताना दिसतात. कारण शहरांमध्ये थांबून ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहणं, ही आता जवळपास अशक्य अशीच गोष्ट झाली आहे. वाढत्या शहरीकरणाचा हा दुष्परिणाम आहे. सर्वत्र प्रकाश असल्यामुळे अंधारावर अवलंबून असलेल्या नैसर्गिक गोष्टींवर विपरीत परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनांमधूनही सिद्ध झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या