भविष्यातील मानव कसा असेल? ज्या पद्धतीने विज्ञान प्रगती करत आहे. नॅनो बायोटेक्नॉलॉजीचं युग आलं आहे. यामध्ये मानवी शरीराचे सर्व अवयव प्रयोगशाळेत तयार केले जातील, जे सध्या अशक्य वाटतात. बायोनिक डोळे विकसित करता येऊ शकतात. रोबोटिक अंगे लावता येतात. प्रयोगशाळेत कृत्रिम अवयव तयार करण्याचं काम सुरू होणार आहे. आपली जीवनशैली रोगांशी जुळवून घेईल. मात्र, नवीन यांत्रिक युग मानवाला आणखी कुमकुवत करेल.
बायोनिक नेत्र - 2100 सालापर्यंत क्वचितच कोणी आंधळे राहील. कारण तोपर्यंत बायोनिक डोळ्याचा शोध लागला असेल. इलेक्ट्रॉनिक उपकरण डोळ्याच्या लेन्सला कृत्रिम रेटिनाशी जोडेल. डोळ्याच्या लेन्सला कॅमेरा जोडलेला असेल, जो सिग्नलच्या प्रक्रियेत रेटिनाशी संपर्क साधेल. हे मज्जासंस्थेशी जोडलेले असल्याने जन्मापासून अंध असलेला व्यक्ती देखील पाहू शकेल.
हाडे स्वतःच वाढू शकतील - 1970 पासून संशोधकांनी प्रथिनेयुक्त हाडांच्या ऊतींचा वापर करून हाडांचे खराब झालेले भाग स्क्रूने जोडण्याचे तंत्र विकसित केलं आहे. पण आता यापुढील तंत्रज्ञान विकसित होत असून हाडं स्वतःच वाढू शकतील.
पोर्टेबल स्वादुपिंड - हे शरीराच्या गरजेनुसार एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर आणि इन्सुलिन समायोजित करण्यास सक्षम असतील. पुढील दशकात ते बाजारात येण्याची शक्यता आहे. हे अधिक चांगले करण्यासाठी सतत संशोधन सुरू आहे. या उपकरणात दोन विशेष तंत्रज्ञान प्रणाली, एक इन्सुलिन पंप आणि दुसरी सतत ग्लुकोज मॉनिटरिंग करणारी असेल.
इलेक्ट्रॉनिक जीभ - जी लोकं वेगवेगळी चव विसरतात अशा लोकांसाठी टेक्सास युनिव्हर्सिटी कृत्रिम जीभ विकसित करत आहेत. विशेषत: अशा प्रकारचे उपकरण विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये वापरले जाऊ शकते. चहाच्या बागा, मोठमोठ्या हॉटेल्समध्येही त्याचा वापर करता येतो. याच्या मदतीने खाद्यपदार्थाची चव कशी असेल आणि त्यात कोणते घटक, जीवनसत्त्वे, चरबी आणि प्रथिने आहेत हे कळू शकेल.
नवीन कृत्रिम अवयव - नॅनोटेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या विकासामुळे सेल्युलर आणि कृत्रिम अवयव विकसित केले जाऊ शकतात, जे केवळ शरीराच्या कोणत्याही भागात बसवता येत नाहीत तर आपल्या शरीराच्या संवेदी प्रणालीशी एकरूप होऊन प्रभावीपणे कार्य करतात. हे सर्व भाग त्यांचे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवतील आणि त्याच्या आदेशांचे पालन करतील.
भविष्यातील माणसांचे केस कमी असतील - डार्विनच्या सिद्धांतानुसार मानवी शरीरात असे अनेक भाग आहेत, जिथे केस अनावश्यकपणे वाढतात. सर्व सस्तन प्राण्यांप्रमाणे, मानवालाही केस असतात पण कमीत कमी. आपल्या शरीराचे केस हळूहळू कमी होत आहेत. आगामी काळात डोके आणि दाढी वगळता शरीराच्या इतर भागावरील केस कमी होऊ शकतात. कपडे, एअर कंडिशनिंग आणि हीटिंगच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शरीराच्या केसांना इन्सुलेट करण्याची प्रवृत्ती अप्रचलित झाली आहे.
मधुमेह आणि हृदयरोगास अधिक प्रतिरोधक - हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेह हे सध्या जगातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत. हे आधुनिक अन्नामुळे अधिक घडत आहे. मात्र, फॅट आणि कॅलरीज असलेले आधुनिक अन्नाशी मानव अनुकूल होत आहे. आपलं शरीर त्यांच्याशी जुळवून घेत असून येत्या काही दशकांमध्ये आपण आपोआप या रोगांना अधिक प्रतिरोधक बनू.
माणसं दुर्बल आणि आजारांना अधिक बळी पडतील - आपण बहुतेक काम यंत्रांच्या सहाय्याने करणार असल्याने भविष्यात मानला आणखी दुर्बल होत जाणार आहे. परिणामी तो अनेक रोगांची शिकार होईल.