पृथ्वीवरील (Earth) पाणी सर्वात जास्त द्रव (Liquid Water) स्वरूपात आहे. पण त्याचे 98 टक्के प्रमाण महासागरांमध्ये (Oceans) आहे. याशिवाय, तलाव, नद्या, हिमनद्या, ध्रुव आणि पर्वतांवर बर्फ, भूगर्भातील साठ्यांच्या स्वरूपात पाणी साठले आहे, त्यामुळे टक्केवारीच्या दृष्टीने ते खूपच कमी वाटत असले तरी प्रमाणाच्या दृष्टीने ते खूप आहे. जलचक्राच्या रूपात मोठ्या प्रमाणात पाणी एका स्रोतातून दुसऱ्या स्त्रोताकडे फिरते.
आतापर्यंत आपल्या खगोलशास्त्रज्ञांना एकही गृह असा सापडला नाही जिथे द्रव पाणी (Liquid Water) आहे. म्हणजेच आजपर्यंत पृथ्वी (Earth) हा एकमेव ग्रह आहे जिथे पाणी द्रव स्वरूपात आहे. नाही म्हणायला चंद्र आणि मंगळावर पाण्याची चिन्हे सापडली आहेत. पण तिथे पाणी फक्त बर्फाच्या रूपातच आढळते. खगोलशास्त्रज्ञांना शनि आणि गुरूच्या चंद्रांमध्ये पृष्ठभागाखाली द्रव पाणी सापडण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, पृथ्वीवर अनेक पाण्याचे साठे (Water reservoirs) आहेत. महासागर, तलाव, नद्या, अगदी वातावरणातही मोठ्या प्रमाणात पाणी असते. पण अखेर पृथ्वीवर किती पाणी आहे? (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
पृथ्वीवरील पाण्याच्या एकूण प्रमाणाबद्दल (Amount of Water) बोलायचे झाल्यास, सध्या सुमारे 326,000,000,000,000,000,000 गॅलन म्हणजेच 326 अब्ज गॅलन पाणी आहे. जे 1260 अब्ज लिटर आहे. पण, हे पाणी एका ठिकाणी नाही आणि जिथे आहे तिथे ते फार काळ टिकत नाही. पाणी अनेक रूपात फिरते. या संपूर्ण प्रक्रियेला जलचक्र म्हणतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
पाण्याच्या जलचक्राबद्दल बोलायचे झाले तर कधी त्याचे बाष्प होते तर कधी डोंगरात गेल्यावर ते बर्फाच्या रूपात गोठते. सूर्याच्या उष्णतेमुळे महासागरांचे पाणी बाष्पीभवन होऊन वातावरणात पोहोचते आणि ते ढगांचे रूप धारण करते. त्यानंतर ते अनेक किलोमीटरचे अंतर कापते. या ढगांचे पाणी पर्जन्याच्या रूपात जमिनीवर आणि समुद्रात पडते. पर्जन्यवृष्टीचे अनेक प्रकार आहेत ज्यात पाऊस, बर्फ, गारा इ. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
पृथ्वीवर पडणारे पाणी नदी-नाल्यांद्वारे महासागरात पोहोचते. महासागर हा पृथ्वीवरील पाण्याचा सर्वात मोठा साठा आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. महासागरांची सरासरी खोली 3688 मीटर आहे. अशा प्रकारे, पृथ्वीवरील 98 टक्के पाणी महासागरांमध्ये आहे. मात्र, हे पाणी मानवाच्या पिण्यायोग्य नाही कारण ते अतिशय खारट पाणी आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
पृथ्वीवरील तीन टक्क्यांहून कमी पाणी गोडे पाणी (Fresh Water) आहे. तर पृथ्वीवरील 1.6 टक्के पाणी ध्रुवांवर बर्फ आणि हिमनद्याच्या रूपात साठलेले आहे. याशिवाय इतर 0.36 टक्के पाणी विहिरी आणि भूजल म्हणजेच भूगर्भातील पाण्याच्या (Ground Water) स्वरूपात आहे. अशाप्रकारे तलाव आणि नद्यांमध्ये केवळ 0.036 टक्के पाणी साठते. जे लाखो अब्जावधी गॅलन पाणी आहे. परंतु, पृथ्वीवरील संपूर्ण पाण्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
यातून उरलेले पाणी एकतर ढग (Clouds) आणि वाफेच्या रूपात पृथ्वीच्या हवेत उडत असते किंवा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कैद होते. मानवी शरीर 65 टक्क्यांहून अधिक पाण्याने बनलेले आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीचे वजन 100 किलो असेल तर त्यातील 65 किलो पाणी आहे. एवढेच नाही तर लोकांच्या घरांमध्ये बादल्या, फ्रीज आणि कोल्ड डिंकमध्ये अनेक अब्ज गॅलन पाणी साचले आहे. (प्रतिकात्मक फोटो: पिक्साबे)
जगात सरोवरे (Lakes) देखील कमी नाहीत. जगात सुमारे 11.7 कोटी तलाव आहेत, जे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 4 टक्के भाग व्यापतात. या पृष्ठभागात ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाच्या हिमनद्यांचा समावेश केलेला नाही. या वितरणानंतरही जगाच्या अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या (Drinking Water) उपलब्धतेची समस्या आहे. कारण, महासागरांचे पाणी खारे आहे आणि गोड्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे नद्या, तलाव, भूजल इत्यादी सर्वत्र उपलब्ध नाहीत. गोड्या पाण्याचे स्त्रोत कमी होत आहेत. परिणामी भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)