अमरनाथ, 9 जुलै : काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेदरम्यान (Amarnath Yatra 2022) मोठा अपघात घडला आहे. अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cave) शुक्रवारी (8 जुलै) संध्याकाळच्या सुमारास मोठी ढगफुटी (Amarnath Cloudburst) झाली. या घटनेत आतापर्यंत 16 भाविकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अमरनाथ हे हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे काश्मीर राज्यातील श्रीनगर शहराच्या ईशान्येला स्थित आहे. या गुहेची लांबी 19 मीटर आणि रुंदी 16 मीटर आहे. ही गुहा 11 मीटर उंच आहे. अमरनाथ गुहा हे भगवान शिवाच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अमरनाथला तीर्थक्षेत्र म्हटले जाते कारण येथेच भगवान शिवाने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले. तुम्हीही भोलेनाथाचे भक्त असाल तर अमरनाथ यात्रेशी संबंधित काही रंजक गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात. अमरनाथ गुहेची आख्यायिका असे मानले जाते की ज्या ठिकाणी अमरनाथ गुहा आहे, त्याच ठिकाणी भगवान शिवाने आपली पत्नी देवी पार्वतीला आपल्या अमरत्वाचे रहस्य सांगितले. त्यांनी माता पार्वतीला सांगितले होते की, ब्रह्मांडाचा अंत झाल्यानंतरही ते मरणार नाही, ते सदैव अमर राहतील. पण, ही कथा सांगताना माता पार्वती झोपी गेली. पण, तिथं असलेल्या कबुतराच्या जोडीने ही कथा ऐकली असे म्हणतात. कबुतरांना अमर कथेचे ज्ञान मिळाल्यापासून आजतागायत ते इथं जीवन जगत आहेत, असे म्हणतात. वास्तविक, बरेच लोक हे एक मिथक मानतात. कारण, कबूतर अशा हवामानात इतके दिवस राहू शकत नाहीत. अमरनाथ यात्रेचा शोध कसा लागला? अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, अमरनाथ गुहेचा शोध बुटा मलिक नावाच्या मुस्लिम मेंढपाळाने लावला होता. प्राणी चरत असताना, बुटा एका साधूला भेटला, जिथे साधूने त्याला कोळशाने भरलेली पिशवी दिली. बुटाने घरी जाऊन पिशवी उघडली असता त्याला कोळसा सोन्याच्या नाण्यांमध्ये बदललेला आढळला. धन्यवाद म्हणायला तो त्या गुहेत पोहोचला तेव्हा त्याला तो साधू तिथे दिसला नाही. आत गेल्यावर त्याला बर्फाचे शिवलिंग सापडले. तेव्हापासून अमरनाथ यात्रा सुरू झाली. अमरनाथ यात्रेसाठी अशा प्रकारे नोंदणी करा सर्व प्रथम श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. Whats new विभागात क्लिक करा. Register Online हा पर्याय निवडा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. आता सर्व आवश्यक माहिती भरा आणि प्रवासासाठी नोंदणी सबमिट करा. यात्रेकरूंना RFID (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) टॅग दिले जातील, ज्यामध्ये श्राइन बोर्ड तुमच्या पुढील हालचाली वाढविण्यात मदत करेल. 13 वर्षांखालील मुले आणि 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना तसेच गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही. Devshayani Ekadashi 2022: 10 तारखेला आहे देवशयनी एकादशी; व्रताची पद्धत, पूजेच्या वेळा जाणून घ्या अमरनाथ गुहेपर्यंत कसे पोहचावे? अमरनाथ यात्रा हेलिकॉप्टरने अमरनाथ यात्रेसाठी श्रीनगर विमानतळावर यात्रेकरू हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे वेळेची बचत होते आणि प्रवासात थकवा जाणवत नाही. अमरनाथ यात्रा रेल्वेने करा अमरनाथ यात्रा सुरू करण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जम्मू तवी आहे, जे पहलगामपासून 315 किमी अंतरावर आहे. रस्त्याने अमरनाथ यात्रा पहलगाम रोड - जम्मू ते पहलगाम पर्यंत कॅब उपलब्ध आहेत. पहलगाम मार्गे अमरनाथ गुहेत पोहोचण्यासाठी सुमारे 5 दिवस लागतात आणि तेथे पोहोचण्यासाठी लोक सहसा घोडा किंवा खेचर वापरतात. बालटाल मार्ग- जम्मू ते बालटाल टॅक्सी भाड्याने घेता येते. याद्वारे तुम्ही अमरनाथ गुहेत जाऊ शकता. हा फक्त एक दिवसाचा ट्रॅक आहे. अमरनाथ जवळ भेट देण्याची ठिकाणे अमरनाथ यात्रेनंतर तुम्ही पहलगाम, सोनमर्ग, गडसर तलाव, बेताब व्हॅली, विशानसार तलाव, अरु व्हॅली आणि बलसारनलाही भेट देऊ शकता.