JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / झी मराठीचा 'बँड बाजा वरात' अन् आहेर तुमच्या घरात Video Viral, नेमका कसा आहे हा न्यू शो?

झी मराठीचा 'बँड बाजा वरात' अन् आहेर तुमच्या घरात Video Viral, नेमका कसा आहे हा न्यू शो?

झी मराठी ‘बँड बाजा वरात’ ( Band BajaVarat) हा नवीन शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी- मनोरंजनाच्या रेसमध्ये नंबरवन राहण्यासाठी प्रत्येत वाहिनी नवीन प्रयोग करत असते. झी मराठी यात मागे कशी राहिल. या नवीन वर्षात झीच्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. किचन कल्लाकार असेल किंवा हे तर काहीच नाय ….असा वेगळा प्रयोग करताना झी दिसतेय. आता या भर टाकायला आणखी एक नवी मालिका लवकरच घेऊन येत आहे. या मालिकेचे नाव ‘बँड बाजा वरात’ ( Band BajaVarat) असं आहे. झी मराठीने नुकताच याचा एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो पाहून सर्वांना उत्सुकता लागली आहे. झी मराठीनं प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की, नवा कार्यक्रम ‘बँड बाजा वरात’ ( Band BajaVarat New Prmo) लवकरच…. #BandBajaVarat #ZeeMarathi. नेहमी या शोची कनेस्पट काय असणार याबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. पण प्रोमोतील कलश पाहून तर लक्षात येत आहे की, ही मालिका लग्नाशीसंबंधीत आहे. या प्रोमो म्हटलं आहे की, झी मराठीकडून सप्रेम ‘बँड बाजा वरात’ झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. शिवाय मालिकेचे नावा देखील ‘बँड बाजा वरात’ असं आहे. त्यामुळे झी मराठीचा हा नवा प्रयोग पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

झी मराठीवरील येऊ कशी तशी नांदायला लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे या मालिकेची जागा कोणती दुसरी नवी मालिका घेणार याची देखील प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे. तसेच झी मराठीवर नव्याने सुरू झालेली देवामाणूस 2 मालिका असेल किंवा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..या मालिका म्हणाव्या तशा  प्रेक्षकांचे मन जिंकू शकलेल्या नाहीत. अशातच आता झी एक नवीन मालिका व नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे. त्यामुळे हा प्रोमो पाहिल्या गेल्यानंतर हा शो पाहण्याची उत्सुकता मात्र प्रेक्षकांना लागली आहे. हा नवीन शो प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी यशस्वी होणार का, हे पाहणं देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या