JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / संगीताने झिंगलेल्या या 6 गायकांची YouTube वर धुम !

संगीताने झिंगलेल्या या 6 गायकांची YouTube वर धुम !

संगीत ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा त्यात करिअर करण्यासाठी, YouTube पेक्षा काहीच चांगले नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै : संगीत ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा त्यात करिअर करण्यासाठी, YouTube पेक्षा काहीच चांगले नाही. त्यामुळे तुम्हालाही काही शानदार गाणी ऐकायची असेल तर तुम्ही निश्चिंत रहा कारण आम्ही तुमच्यासाठी YouTube वर कल्ला करणाऱ्या काही धमाकेदार कलाकरांचं संगीत घेऊन आलो आहोत. युट्यूबवर सध्या या 6 कलाकारांनी राज्य केलं आहे. आकाश बाघला : सध्या YouTubeवर मॅश-अपचा जमाना आहे. मॅश-अपमध्ये अनेक गाणी किंवा एकाच ट्यूनमध्ये सगळी गाणी गाण्याचा ट्रेंड आहे. आकाश या सगळ्यात मास्टर आहे. रेशके-कमर, बन जा तू मेरी रानी, मर्सीसारख्या अनेक गाणी गाऊन त्यांनी लोकांना वेड लावलं आहे. त्याच्या युट्यूब पेजला 8 लाख 63 हजार  सब्सक्राइबर आहेत.

श्रद्धा शर्मा : गिटार आणि संगीत ही श्रद्धाची स्टाईल आहे. ‘लंदन ठुमकदा’, ‘फिर से उड़ चला’, ‘हर किसी को नहीं मिलता’ ही सगळी गाणी तुम्ही श्रद्धाच्या आवाजात नक्की ऐका.

एकॉस्टिक सिंग : एकॉस्टिक फक्त गिटारसोबत गाणी म्हणतो. त्यांने जुन्या आणि नव्या सगळ्या गाण्यांना त्याच्या स्टाईलमध्ये गायलं आहे.

महेश राघवन : महेश कर्नाटिकी संगीताचा फ्यूजन आर्टिस्ट आहे. सध्या तो आय-पॅडवर गाणी वाजवतो. ‘उर्वशी’, एड शीरन के ‘शेप ऑफ यू’, ‘डेस्पासितो’ या सगळ्या सुपरहिट गाण्यांना त्याने त्याच्या आवाजात गायलं आहे.

लीसा मिश्रा : भारतीय मुलगी लीसा ही शिकागोला राहते. ती गिटार वाजवत तिच्या आवाजत सुरेल गाणी गाते.

बाबा कुटानी : सध्या हळू-हळू युट्यूब एक नाव गाजतय ते म्हणजे बाबा कुटानीचं. त्याच खरं नाव सुमित कुटानी आहे. सुमित हँडपॅन वाजवण्यामध्ये माहिर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या