बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना पाळीव प्राण्यांवर खुपचं प्रेम आहे. आणि या कलाकारांकडे किमान 1-2 तरी पाळीव प्राणी आहेतच. आज ‘वर्ल्ड पेट डे’ च्या निमित्ताने अशाच काही काल्कारांच्या लाडक्या ‘पेट’ विषयी पाहणार आहोत.
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना पाळीव प्राण्यांवर खुपचं प्रेम आहे. आणि या कलाकारांकडे किमान 1-2 तरी पाळीव प्राणी आहेतच. आज 'वर्ल्ड पेट डे' च्या निमित्ताने अशाच काही काल्कारांच्या लाडक्या 'पेट' विषयी पाहणार आहोत.
बॉलीवूडची बबली गर्ल आलिया भट्टसुद्धा आपल्या पाळीव प्राण्यांवर भरभरून जीव लावते. आलियाकडे एक खूपच सुंदर मांजर आहे. आलिया सतत तिच्यासोबत मस्ती करताना दिसून येते. तिच्यासोबात्चे बरेच फोटोही ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
बॉलीवूडचा दबंग सलमान खानसुद्धा आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन तितकाच भावनिक आहे. सलमानजवळ एक 'नेपोलियन' नावाचा श्वान होता. त्याच्यावर to खुपचं जीव लावत होता. मात्र 2018 मध्ये त्याचा मृत्यू झाला. सलमान त्याच्यासोबतच्या आठवणी सतत सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसेच सलमानजवळ लॅब्रेडोर,फ्रेंच मस्टिफ,सेंट बर्नार्ड ब्रीड असे विविध श्वान आहेत. मोगली, वीर, सँडी अशी त्यांची नावे आहेत.
'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर सुद्धा आपल्या पाळीव प्राण्यांवर जीव ओवाळून टाकते. ती आपल्या या मित्रांवर इतकं प्रेम करते की त्यांच्या वाढदिवसासाठी खास पार्टीसुद्धा आयोजित करते.
प्रियांका चोप्राचं 'पेट लव'सुद्धा सर्वचाहत्यांना नक्क्कीच माहिती आहे. प्रियांकाकडे डियानो, गिनो आणि पांडा अशी तीन श्वान प्रियांका जवळ आहेत.
दिशा सतत आपल्या सोशल मीडियावर आपल्या पेट्स सोबतचे फोटो शेअर करत असते. त्यावरून दिशाला ते किती प्रिय आहेत याचा अंदाज येतो. तिच्याजवळ 1-2 नव्हे तर तब्बल 4 पाळीव प्राणी आहेत. त्यामध्ये बेला आणि गोकू नावाचे 2 श्वान आहेत. तर जास्मिन आणि किटी नावाच्या दोन मांजरसुद्धा आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर पती असणारा विराट कोहलीसुद्धा आपल्या पाळीव प्राण्यांवर खुपचं प्रेम करतात. सतत त्यांच्या सोबत वेळ घालवत असतात. त्यांचा एक लाडका श्वान 'ब्रुनो' याचा गेल्या वर्षीचं मृत्यू झाला.
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि तिची बहिण नुपूर सेनन सुद्धा आपल्या पाळीव प्राण्यांवर जीव देतात. त्यांना श्वान खुपचं आवडतात. त्यांच्याजवळ 'bichon frise' जातीचा एक श्वान आहे. त्याला लाडाने त्या 'डिस्को' असं बोलवितात.