लहान कपडे घातले तर मुस्लीम धर्मात मला…; छोट्या कपड्यांमुळं हिबानं दिला होता शो सोडण्याचा इशारा
जीजाजी छत पर है या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली हिबा नवाब ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मात्र हिबानं अद्याप कधीही बोल्ड किंवा लहान कपडे परिधान केले नाहीत. याबाबत अनेकदा तिचे शोच्या निर्मात्यांसोबत खटके देखील उडाले आहेत.
परंतु तिनं लहान कपडे किंवा रिलिविंग कपडे परिधान करण्यास स्पष्ट नकार दिला. अगदी शोमधून बाहेर काढलं तरी चालेल पण असे कपडे परिधान करणार नाही अशी जणू भूमिकाच तिनं घेतली.
हिबा म्हणाली मी मुस्लीम कुटुंबातील तरुणी आहे. त्यामुळं मी लहान कपडे परिधान करत नाही. मुस्लीम संस्कृतीनुसार अंगप्रदर्शन करण्यास मनाई आहे त्यामुळं मी कधीही लहान कपडे परिधान करत नाही.
“मालिकेत ग्लॅमरस दिसण्यासाठी अनेकदा मला बोल्ड कपडे परिधान करण्यास विचारलं गेलं. परंतु मी नेहमीच नकार दिला. अगदी काम मिळालं नाही तरी चालेल पण मी आपली तत्व मोडणार नाही”
“अन् जरी मी माझी तत्व मोडून हॉट दिसण्याचा प्रयत्न केला तरी ते माझ्या कुटुंबीयांना आवडणार नाही. शिवाय त्यांचं मन मोडून मला करिअर करण्याची इच्छा नाही.” असंही ती या मुलाखतीत म्हणाली होती.
हिबानं 2008 साली शू...फीर...कोई है या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती क्रेझी स्टुपिड इश्क, मेरी सासू मा, कुछ स्माईली हो जाए यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं.
सध्या ती जीजाजी छत पर है या मालिकेत झळकत आहे. या मालिकेमुळं तिला खऱ्या अर्थान लोकप्रियता मिळाली.