क्रिकेटपटूंसोबत लग्न केल्यामुळं या अभिनेत्रींनी ठोकला बॉलिवूडला रामराम
क्रिकेट आणि बॉलिवूडचं नात खुपचं जुनं आहे. अनेक क्रिकेटर्स अभिनेत्रींच्या प्रेमात पडले, आणि त्यांच्याशी लग्न सुद्धा केलं आहे. मात्र त्यांनतर त्या अभिनेत्रींचं फिल्मी करीयर मात्र संपुष्टात आलं. पाहूया अशाच काही अभिनेत्री.
अभिनेत्री गीता बसराने 2015 मध्ये हरभजनसिंग सोबत लग्न केलं होतं. 2016 मध्ये ती एका पंजाबी चित्रपटात दिसली होती. मात्र त्यांनतर तिने कोणताही चित्रपट केला नाही.
अभिनेत्री नताशा स्टनकोवीचने क्रिकेटर हार्दिक पांड्या सोबत लग्न केल आहे. त्यानंतर ती केवळ एका वेबसिरीजमध्ये दिसली होती.
मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेनं क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केल आहे. तीसुद्धा चित्रपटांपासून लांब आहे.
अभिनेत्री संगीता बिजलानीने सुद्धा क्रिकेटर मोहम्मद अझरूद्दीन सोबत लग्न केल होतं. मात्र ते दोघे 2010 मध्ये विभक्त झाले आहेत. लग्नानंतर संगीतासुद्धा बॉलिवूड पासून दूरचं आहे.