दीपिका पदुकोण बॉलिवूडमधल्या फिट अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती तिच्या डाएटबाबत अतिशय जागरुक आहे.
दीपिका पदुकोण बॉलिवूडमधल्या फिट अभिनेत्रींमध्ये गणली जाते. खवय्यी असलेल्या दीपिकासाठी तिचा फिटनेससाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. जाणून घेऊयात काय आहे तिच्या परफेक्ट फिगरचं रहस्य...
दीपिका तिच्या डाएटबाबत अतिशय जागरुक आहे. रिपोर्टनुसार ती दिवसभरातून ती 6 वेळा थोड-थोड्या प्रमाणात खाणं खाते. मात्र यात फक्त हेल्दी अन्न पदार्थांचा समावेश असेल याची सुद्धा ती काळजी घेते.
दीपिकाच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यानं होते. 1 ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस टाकून हे पाणी ती सकाळी पिते.
दीपिकाच्या ब्रेकफास्टमध्ये 2 अंडी, 2 बदाम, 1 कप लो फॅट मिल्क, 2 इडल्या किंवा 2 प्लेन डोसा किंवा उपमा याचा समावेश असतो.
दुपारच्या जेवणाआधी दीपिका ताजी फळं खाते. तर दुपारच्या जेवणात घरीच बनवलेली डाळ-भात, भाजी, सलाड आणि दही याचा समावेश असतो. तर कधी कधी प्रोटीनसाठी ती ग्रील फिश खाते.
सध्याकाळच्या नाश्त्यामध्ये ती फिल्टर कॉफी, नट्स आणि काही फळं खाते. तर रात्रीच्या जेवणात भाजी-चपाती, फ्रेश ग्रीन सलाड याचा समावेश असतो. या शिवाय बॉडी हायड्रेशनसाठी ती नारळ पाणी किंवा मग फ्रुट ज्यूस पिते. तर डेझर्टमध्ये डार्क चॉकलेटला तिची पसंती असते.
रिपोर्टनुसार दीपिकाचा कोणताही फिक्स असा डाएट प्लान नाही. सिनेमाच्या गरजेनुसार ती तिच्या डाएट प्लानमध्ये वेळोवेळी बदल करते. याशिवाय ती तिच्या वर्कआऊटबाबतही खूप जागरुक आहे.
दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच 'छपाक' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच कबीर खानच्या '83' सिनेमातही ती रणवीर सिंहच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार आहे.