JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दिला गेलाय. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर केलाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

13 एप्रिल : मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दिला गेलाय. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर केलाय. राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर हा पुरस्कार घोषित केला गेलाय. गेल्या वर्षी या अभिनेत्याचं निधन झालं. रोमँटिक, देखणा अभिनेता म्हणून विनोद खन्ना बाॅलिवूडमध्ये लोकप्रिय होते. या रोमँटिक अभिनेत्याची सुरुवात मात्र झाली होती ती खलनायक म्हणून.  1968मध्ये ‘मन का मीत’मध्ये त्यांनी छोटीशी खलनायकाची भूमिका केली होती. आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांचा ‘मेरे अपने’ सिनेमातला अँग्री यंग मॅन, ‘मेरा गाँव मेरा देस’मधला खलनायक, ‘अचानक’मधला लष्करी अधिकारी जास्त गाजले. अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, शानसारख्या सिनेमांतून इतर अभिनेत्यांसोबतही त्यांनी स्वत:ची वेगळी छाप पाडली. अगदी अलिकडचे दिलवाले, दबंग, दबंग 2 सिनेमे होते. त्यातली त्यांची भूमिकाही लक्षात राहणारी ठरली. विनोद खन्ना यशाच्या शिखरावर असतानाच ते ओशो रजनीश यांचे भक्त बनले. आणि 5 वर्ष त्यांनी बाॅलिवूडला रामराम ठोकला होता. त्यानंतर बाॅलिवूडला परतल्यावर त्यांनी इन्साफ आणि सत्यमेव जयते हे हिट सिनेमेही दिले. अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास झाला. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. पंजाबच्या गुरुदासपूरमधून ते खासदार होते.  संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयात ते मंत्री होते. विनोद खन्ना यांची राजकीय कारकीर्द : 1997 साली भाजपमध्ये प्रवेश 1998 साली पंजाबमधील गुरदासपूर खासदार 1999 साली पंजाबमधील गुरदासपूर खासदार 2004 निवडणुकीत पुन्हा लोकसभेवर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव जुलै 2002 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री 6 महिन्यांतच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रिपदाची 2014 मध्ये लोकसभेतून विजय विनोद खन्ना यांना मिळालेले पुरस्कार: 1975 - हाथ की सफाई - सर्वोत्कृष्ट सहकलाकार - फिल्मफेअर पुरस्कार 1977 - हेरा फेरी - सर्वोत्कृष्ट सहकलाकार - नामांकन 1979 - मुकद्दर का सिकंदर - सर्वोत्कृष्ट सहकलाकार - नामांकन 1981- कुर्बानी - सर्वोत्कृष्ट अभिनेता 1999 - जीवनगौरव पुरस्कार 2001 - जीवनगौरव पुरस्कार 2005 - स्टारडस्ट रोल मॉडेल ऑफ द ईयर पुरस्कार 2007 -  झी सिने जीवनगौरव पुरस्कार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या