JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विजय देवरकोंडा खरंच रश्मिका मंदानाला करतोय डेट?; करणने केला मोठा खुलासा

विजय देवरकोंडा खरंच रश्मिका मंदानाला करतोय डेट?; करणने केला मोठा खुलासा

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. विजयने नुकतंच बॉलिवूड पदार्पण केलं असून त्याचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला.

जाहिरात

karan johar and Vijay Deverkonda

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 सप्टेंबर : दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. विजयने नुकतंच बॉलिवूड पदार्पण केलं असून त्याचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला. त्यामुळे तो बॉलिवूड बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये गुरफटला गेला असल्याचं बोललं जातंय. अशातच त्याच्या रिलेशनशिपमुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय. यावेळी त्याच्या रिलेशनशिपविषयी फिल्ममेकर करण जोहरने खुलासा केला आहे. विजयने कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. या शोचा नुकताच शेवटचा भाग प्रसारित झाला. या भागासाठी स्पेशल गेस्ट तन्मय भट, कुशा कपिला, दानिश सैत आणि निहारिका एनएम असलेले पहायला मिळाले. या गेस्टनं करणची चांगलीच क्लास लावली. यावेळी गेस्टने करणवर अनेक प्रश्नांचा भडिमार केला. यामध्ये त्यांनी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशीपमध्ये असल्याचंही विचारलं. हेही वाचा -  ‘मी तुला माझ्या शोमध्ये…’; तापसी पन्नू कॉफी विथ करणमध्ये सहभागी न झाल्याबद्दल करणचा मोठा खुलासा करणने यावर उत्तर देताना संगितलं की, माझ्या माहितीनुसार तो सिंगल आहे. अधिकृतपणे तो सिंगल आहे. या उत्तरानं सगळेच हैराण झाले. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चाहते पसंत करतात. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’मध्ये ते दोघे एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्या दोघांना रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्याप यावर दोघांपैकी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

कॉफी विथ करणच्या शेवटच्या भागात करणने अजून अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली पहायला मिळाली. हा भाग सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. या संपूर्ण सीझनलाही चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या