JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO VIRAL: राखी सावंतने NASAवरून मागवली औषधं, चीनला जाऊन करणार कोरोनाचा खात्मा

VIDEO VIRAL: राखी सावंतने NASAवरून मागवली औषधं, चीनला जाऊन करणार कोरोनाचा खात्मा

या व्हिडिओमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनाही आवाहन केलं आहे

जाहिरात

हे आरोप करताना ती सलमान खानवर चांगलीच भडकली आणि त्याला तिने दम देतच सुनावलंही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी : बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत ((Rakhi Sawant) सोशल मीडियावर बरीच अक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी राखी राजकीय क्षेत्रातही बिनधास्तपणे आपलं मत व्यक्त करते. खरं तर प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ती नेहमी नवनव्या क्लृप्त्या शोधत असते. काही दिवसांपूर्वी राखीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Rakhi Sawant Instagram) असं काहीतरी शेअर केलं आहे की ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. राखीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी चीनला रवाना होत आहे. राखी या व्हिडिओमध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) खात्मा करण्याचा दावा करतेय. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) 300 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

राखी सावंतने फ्लाइटमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कोरोना व्हायरसचा उल्लेख करीत आहे. लोक या व्हायरसमुळे त्रस्त आहेत. हा व्हायरस संपविण्यासाठी मी चीनला जात असल्याचे राखी म्हणत आहे. इतकचं नाही तर चीनमधील कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी तिने नासाहून औषधं आणल्याचा दावा केला आहे. आता ही औषधं ती चीनला घेऊन जात आहे. या व्हिडिओमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. आणि गळ्यात मंगळसूत्रदेखील घातलं आहे. काही दिवसांपूर्वी राखी सांवतच्या लग्नावरुन तिने मोठा खुलासा केला होता. फ्लाइटमधील या व्हिडिओमध्ये ती चीनमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी जात असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये तिने मोदींजींनाही आवाहन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या