JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : शकिराच्या गाण्यावर उर्वशी रौतेलाचा Belly Dance, मादक अदांवर चाहते फिदा

VIDEO : शकिराच्या गाण्यावर उर्वशी रौतेलाचा Belly Dance, मादक अदांवर चाहते फिदा

नुकताच उर्वशीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती Belly डान्स करताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. उर्वशी नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. उर्वशी जेवढी चांगली अभिनेत्री आहे तेवढीच चांगली ती डान्सर सुद्धा आहे. नुकताच तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती शकीराच्या हिप्स डॉन्ट लाय (Hips Don’t Lie ) गाण्यावर Belly डान्स करताना दिसत आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तिच्या मादक अदांवर चाहते घायाळ झालेले पाहयला मिळत आहेत. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर सध्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी तिनं काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती.

जाहिरात

उर्वशीनं सनी देओलच्या सिंग साहब द ग्रेट या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिचा हेट स्टोरी 4 हा सिनेमा खूप गाजला. उर्वशीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लॉकडाऊनच्या आधी तिचं ‘एक डायमंड दा हार लेदे यार’ हे गाणं रिलीज झालं होतं. तिच्या या गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. याशिवाय त्याआधी ती पागलपंती या सिनेमात दिसली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या