JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed ने पापाराझींसमोर 'हे' काय काढलं ड्रेसमधून, सोशल मीडियावर रंगली चर्चा

Urfi Javed ने पापाराझींसमोर 'हे' काय काढलं ड्रेसमधून, सोशल मीडियावर रंगली चर्चा

फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. नवनवीन लुकने ती नेटकऱ्यांना थक्क करत असते. अशातच उर्फीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट : फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. नवनवीन लुकने ती नेटकऱ्यांना थक्क करत असते. अशातच उर्फीचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. नेहमीप्रमाणेच हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून इंटरनेटचं तापमान वाढवत आहे. या व्हिडीओनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं असून तिचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फी जावेदच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या ड्रेसमधून पैसे बाहेर काढताना दिसते. परत ती पैसे ड्रेसमध्ये ठेवत आहे. तिचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे चुकीचे असल्याचे म्हणत काही लोक उर्फीला ऐकवत आहेत.

संबंधित बातम्या

‘यावेळी तरी थोडे कपडे घातलेत, हिची तब्बेत तर ठीक आहे ना, आज ठीक ठाक घातलंय. पैसे ठेवायला दुसरी कोणती जागा नाही मिळाली का, ही वेडी आहे का’, अशा भरभरून कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. काही वेळातच या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं. आतापर्यंत उर्फीनं अनेक वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत हटके कपडे बनवले आहेत. प्रत्येक वेळी ती आपल्या फॅशन सेन्समुळे नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करत असते. तिच्या लूकचं अनेकजण कौतुकही करतात तर काहीजण तिला ट्रोलही करतात. हेही वाचा -  Urfi javed : नग्न होण्याचं इतकं वेड का? ट्रोलर्सच्या प्रश्नाचं उर्फीनं दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही माराल डोक्याला हात दरम्यान, उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तरीही ती तिच्या कामापेक्षा त्याच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या