JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / TRP मीटर : राधिका शनायाच्या जुगलबंदीने सगळ्यांची गेली 'हवा', या आहेत टाॅप 5

TRP मीटर : राधिका शनायाच्या जुगलबंदीने सगळ्यांची गेली 'हवा', या आहेत टाॅप 5

TRP Meter, Mazya Navryachi Bayako, Sambhaji - टीआरपी रेटिंगमध्ये कुठली मालिका कुठल्या नंबरवर आहे ते पाहा -

0107

दर आठवड्याला या दिवशी टीआरपी येतो. मागच्या आठवड्यात कुठली मालिका, कुठला शो किती नंबरवर आहे, ते कळतं. हल्ली प्रत्येक वेळी मालिकांचे नंबर्स बदलत असतात. या वेळचं टीआरपी रेटिंग गेल्या वेळेपेक्षा नक्कीच वेगळं आहे.

जाहिरात
0207

चला हवा येऊ द्या शोचा गेल्या वेळी 5वा नंबर आलेला. याही वेळी या शोनं आपलं स्थान सोडलेलं नाही. हल्ली इतर मालिकांमधले सेलिब्रिटी येऊन हा शेलिब्रिटी पॅटर्न साजरा करतात. मालिका 5व्या नंबरवर आहे.

जाहिरात
0307

गेले दोन आठवडे पहिल्या पाचातही नसलेली तुला पाहते रे मालिका या वेळी चौथ्या स्थानावर आलीय. मालिकेत झेंडे विक्रांत सरंजामेला ईशापासून वाचवण्यासाठी पळवून नेतो. त्या आठवड्यातलं हे नाट्य चांगलंच रंगलं आणि प्रेक्षकांना आवडलेलं दिसतंय.

जाहिरात
0407

टीआरपी रेटिंगमध्ये पुन्हा एकदा झी मराठीच्या मालिकाच असल्या तरीही नवी सुरू झालेली 'मिसेस मुख्यमंत्री'ला अजून पहिल्या पाचात स्थान मिळालं नाहीय. शिवाय रात्रीस खेळ चाले ही मालिकाही अनेक जण बघतात. तीही अजून लांबच आहे. स्टार प्रवाहवरची जीवलगा, कलर्स मराठीवरचा बहुचर्चित शो बिग बाॅस मराठी यांनाही अजून पहिल्या पाचात जागा मिळालेली नाही.

जाहिरात
0507

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सध्या पूर्ण नाट्यमय झालीय. संभाजी महाराजांच्या दरबारात अनाजी पंत आणि कारभारी यांचा न्यायनिवाडा सुरू असलेल्या आठवड्याच्या टीआरपीत मालिकेनं तिसरा नंबर पटकावलाय. मालिकेतले कलाकार अभिनयानं इतिहास उभे करतातच, शिवाय त्यांची वेशभूषा, दरबाराचा सेट याही गोष्टी मालिकेचा दर्जा वाढवतात.

जाहिरात
0607

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणादाची पुन्हा एन्ट्री झाल्यानं मालिकेत जीव आला. ही मालिका यावेळी दुसऱ्या नंबरवर आलीय. आता राणादा, अंजली याचे सूर जुळतायत का, वहिनीसाहेबांचे डावपेच कसे निकामी होतायत, राजा बनून आलेला राणाच आहे का हे सगळे प्रश्न प्रेक्षकांना पडलेत.

जाहिरात
0707

गेल्या वेळी नंबर वनवरून खाली सरकलेली मालिका पुन्हा एकदा नंबर वन बनलीय. माझ्या नवऱ्याची बायको मालिका यावेळी नंबर वन झालीय. राधिकानं गुरूचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला, हा मालिकेचा हाय पाॅइंट. नंतर सगळ्यांनी मिळून गुरूची धुलाई केली. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या मालिकेला नंबर वन केलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या