सक्सेस साजरं करण्यासाठी गायकानं लढवली शक्कल; 23 हजार हिऱ्यांचं केलं लॉकेट
टायलर द क्रिएटर (Tyler the Creator) हा पाश्चात्य संगीतसृष्टीतील सध्याच्या आघाडिच्या रॅपर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.
‘बास्टर्ड’ या गाण्यातून प्रकाशझोतात आलेल्या टायलरचा ‘कॉल मी इफ यु गेट लॉस्ट’ (Call Me If You Get Lost) हा म्युझिक अल्बम नुकताच प्रदर्शित झाला.
या अल्बमला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय यामुळे त्याला कोट्यवधींचा नफा देखील झाला.
जगप्रसिद्ध सेलिब्रिटी ज्वेलर एलेक्स मॉस याने या खास लॉकेटच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली होती.
सोनं आणि हिऱ्यांपासून या लॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे. टायलरनं स्वत:ची प्रतिकृती या लॉकेटमध्ये बनवण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे एक लहानसा हिऱ्यांनी मढवलेला स्टॅच्यु मॉसने तयार केला आहे.
या विशेष लॉकेटची किंमत तब्बल चार कोटी रुपये इतकी आहे. शिवाय मेकिंगसाठी आणखी 75 लाख रुपये डिझायनरला द्यावे लागले.
टायलरने या महागड्या लॉकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे लॉकेट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.