02 सप्टेंबर : छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारा डाॅक्टर मशहूर गुलाटी अर्थात सुनील ग्रोव्हरला डेंगूची लागण झाली आहे. सुनीलला एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलंय. सुनील ग्रोव्हर एका कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता. तिथून आल्यानंतर त्याला ताप आला. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला डेंगू झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तातडीने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, सुनील ग्रोव्हर कपीस शर्माच्या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर स्टार प्लसवर सुरू होणाऱ्या काॅमेडी शोचं सुत्रसंचालन करणार आहे. या शोच्या जजच्या भूमिकेत अक्षयकुमार असणार आहे. पण, अजूनही सुनील ग्रोव्हरच्या भूमिकावर प्रश्नचिन्ह आहे.