श्वेता तिवारीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेर केले आहेत. फोटो पाहून चाहते घायाळ होत आहेत.
छोट्या पडद्यावर प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सतत चर्चेत असते. श्वेता टीव्हीवरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.वयाच्या चाळीशीतही ती इतकं फिट आणि ग्लॅमरस आहे, की पाहून सर्वच थक्क होता.
श्वेता तिवारीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेर केले आहेत. फोटो पाहून चाहते घायाळ होत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने रेडी टु वियर साडी नेसली आहे. स्किन कलरच्या या साडीमध्ये श्वेता जबरदस्त दिसत आहे.
अभिनेत्री या वयातही इतकी ग्लॅमरस दिसत आहे, की ती दोन मुलांची आई आहे. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
श्वेता तिवारीची मुलगी पलक नुकताच हार्डी संधूसोबत 'बिजली बिजली' गाण्यात झळकली होती. हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. तसेच ती लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
पलकची आई श्वेता फिटनेस आणि ग्लॅमरच्या बाबतीत तिलाही टक्कर देते. ती पलकची आई नव्हे तर मोठी बहीण वाटते.
श्वेता तिवारी नुकताच 'खतरों के खिलाडी' मध्ये झळकली होती. यामध्ये श्वेताचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसून आलं.
श्वेता सध्या आधीपेक्षा जास्त स्लिम आणि फिट झाली आहे. त्यामुळे चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.