JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Weight Loss Tips: श्वेता तिवारीने कमी केलं चक्क 10 किलो वजन; अभिनेत्रीने दिल्या खास वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips: श्वेता तिवारीने कमी केलं चक्क 10 किलो वजन; अभिनेत्रीने दिल्या खास वेट लॉस टिप्स

Shweta Tiwari Weight Loss: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या लुक आणि फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे.श्वेताला पाहून तिचं वय सांगणं कठीण आहे. मात्र सध्या ती 41 वर्षांची आहे.

019

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या तिच्या लुक आणि फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे.श्वेताला पाहून तिचं वय सांगणं कठीण आहे. मात्र सध्या ती 41 वर्षांची आहे.

जाहिरात
029

श्वेताचं इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या ग्लॅमरस फोटोंनी भरलेलं आहे. ती दररोज ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आणि या सर्वांमध्ये तिचं ट्रान्सफॉर्मेशन स्पष्ट दिसून येतं.

जाहिरात
039

अशा परिस्थितीत आता चाहत्यांना दोन मुलांची आई असलेल्या श्वेताने इतकं वजन कमी कसं केलं हे जाणून घ्यायचं आहे. अभिनेत्रीने 2019 मध्ये वेट लॉस जर्नी सुरु केली होती.

जाहिरात
049

श्वेता तिवारी सांगते, दुसऱ्या प्रेग्नेंसीनंतर तिचं वजन प्रचंड वाढलं होतं. तिने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहलंय की, "माझं वजन 73 किलो झालं होतं. 'हम तुम और Them' सुरू करण्यापूर्वी, मला माझ्या भूमिकेत फिट होण्यासाठी वजन कमी करण्याची प्रचंड गरज होती."

जाहिरात
059

दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर वेट लॉस जर्नीमध्ये सांगितलं होतं की, डिलिव्हरीनंतर तिने फक्त आहारावर नियंत्रण ठेवून तब्बल 10 किलो वजन कमी केलं होतं. श्वेताने त्या डाएटमध्ये चीट-डेचाही समावेश केला होता. त्यांनतर अभिनेत्रीने एक्सरसाइजसुद्धा सुरु केली होती.

जाहिरात
069

ती तिच्या फिटनेसचं श्रेय तिच्या आहारतज्ञ सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट किनिता कडकिया पटेल यांना देते. योग्य फिटनेस मिळविण्यासाठी त्यांनी तिच्या आहाराची पूर्ण काळजी घेतली होती

जाहिरात
079

श्वेताने सांगितलं की, वजन कमी करणं सोपं नाही. त्यासाठी खूप इच्छाशक्ती, समर्पण आणि स्वतःवर नियंत्रण हवं. ते अशक्यही नाही. विशेषत: जेव्हा तुमच्याकडे किनिता कडाकियासारखे लोक असतात जे हा कठीण प्रवास सोपा आणि मजेदार करतात.

जाहिरात
089

श्वेता सांगते की, सुरुवातीला कामाच्या व्यापामुळे तिला व्यायाम करणं शक्य होत नव्हतं. परंतु नंतर तिने डाएटसोबत एक्सरसाइजसुद्धा आपल्या रुटीनमध्ये सहभागी केलं. अभिनेत्रीच्या न्यूट्रीशियन्सच्या मते, श्वेताच्या जेवणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्सचं खूप चांगलं मिश्रण आहे.

जाहिरात
099

तसेच, श्वेता दिवसभर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. यासोबतच तिला ताज्या फळांचं ज्यूस आणि नारळपाणी पिणंही आवडतं. तसेच श्वेता योगा करते आणि वीकेंडला आपल्या मुलीसोबत पोहण्याचा आनंदसुद्धा घेते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या