JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tunisha Sharma Net worth: 20 व्या वर्षी इतक्या कोटींची मालकीण होती तुनिषा, आकडा वाचून व्हाल थक्क

Tunisha Sharma Net worth: 20 व्या वर्षी इतक्या कोटींची मालकीण होती तुनिषा, आकडा वाचून व्हाल थक्क

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली.

जाहिरात

तुनिषा शर्मा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध  अभिनेत्री तुनिषा शर्मा ने मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या दु:खद बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने एवढं टोकांचं पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एवढ्या लहान वयात तुनिषा हे जग सोडून गेल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. तुनिषा प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. अनेक भूमिकांमधून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. एवढंच नाहीतर तीनं कोट्यवधींची मालमत्ताही कमावली. 20 वर्षीव तुनिषा जाताना मागे किती संपत्ती सोडून गेली पाहुयात. तुनिषाला डान्स आणि अॅक्टिंगची खूप आवड होती. तिनं आपलं करिअर याच क्षेत्रात करायचं ठरवलं होतं. छोट्याशा कारकिर्दीत तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं. केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही तिने आपलं नशीब आजमावलं. ‘भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2’, ‘दबंग 3’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. हेही वाचा -  Tunisha Sharma : सुशांत सिंह ते वैशाली टक्कर; तुनिषाच्या आधी या कलाकारांनीही उचललंय टोकाचं पाऊल अल्पावधीतच यशाची शिखरे गाठणारी तुनिषा शर्मा तिच्या स्वत:च्या आलिशान घराची मालकिन होती.  तुनिषाच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिशान घरासोबतच तुनिषा शर्मा अनेक आलिशान गाड्यांचीही मालकीण होती. तुनिषा 15 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक होती. वयाच्या 20 व्या वर्षी तिची लोकप्रियता प्रचंड होती. अभिनयाव्यतिरिक्त ती जाहिरांतीमधूनही बक्कळ पैसा कमवायची.

दरम्यान, काल रात्री उशिरा तुनिषाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आला. तुनिषाचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं आहे. तुनिषाच्या पोस्टमॉर्टमवेळी 4-5 डॉक्टर उपस्थित होते. पोस्टमॉर्टमची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. मात्र, मृतदेह अजूनही जेजे रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर काही गैरप्रकार झाला की नाही हे समजू शकेल. त्यामुळे रिपोर्टमधून काय मोठा खुलासा होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रविवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या