JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / TRP मीटर : 'मिसेस मुख्यमंत्री'ची लोकप्रियता कायम, 'ही' मालिका अजूनही नंबर 1

TRP मीटर : 'मिसेस मुख्यमंत्री'ची लोकप्रियता कायम, 'ही' मालिका अजूनही नंबर 1

TRP Ratings, Zee Marathi - तुमची आवडती मालिका कुठल्या स्थानावर आहे ते पाहा

0107

गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे. अगदी वेगवेगळ्या मालिकांमध्येही. आता या वेळचं टीआरपी रेटिंग आलंय, ते गेल्या आठवड्याचं. पाहा कुणी बाजी मारलीय ते.

जाहिरात
0207

मिसेस मुख्यमंत्री मालिकेनं आपला पाचवा नंबर काही सोडलेला नाही. सुमी आणि समरची लगीनघाई मस्त चाललीय. लग्नानंतर सुमी आणि तिच्या सासूमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगणार आहे. सध्या प्रेक्षकांना ही मालिका आवडतेय.

जाहिरात
0307

चला हवा येऊ द्या शोनंही आपला चौथा नंबर कायम ठेवलाय. या शोमधला शेलिब्रिटी पॅटर्न सगळ्यांना आवडतोय. मालिकांमधल्या कलाकारांची धमाल छान जमलीय. शिवाय नेहमीचे भाऊ कदम, श्रेया बुगडे, सागर करंडे, डाॅ. साबळे यांचं धूमशानही जबरदस्त असतं. सतत नवे विषय घेऊन हा शो ताजातवाना ठेवलाय.

जाहिरात
0407

संभाजी मालिकेत सध्या जंजिऱ्यावर अडकलेल्या कोंडाजीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. संभाजी महाराजही जंजिरा सर करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. प्रेक्षक जितके मालिकांच्या जगात रमतात, तितकेच इतिहासातही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय.

जाहिरात
0507

पुन्हा एकदा पहिल्या पाचात फक्त झी मराठीच्या मालिकाच आहेत. खरं तर गेल्या आठवड्यात मराठी बिग बाॅसचा ग्रँड फिनाले होता. पण तरीही त्या शोला पहिल्या पाचात स्थान मिळालं नाहीच.

जाहिरात
0607

माझ्या नवऱ्याची बायको मालिका बरेच दिवस दुसऱ्या नंबरवरच आहे. आता गुरू आणि शनाया एकत्र आलेत. ते गुलमोहर सोसायटीत राहायला आलेत आणि राधिकाला जमेल तसा त्रास देतायत.

जाहिरात
0707

राणादानं आपलं पहिलं स्थान काही सोडलेलं नाही. तुझ्यात जीव रंगला नंबर वन आहे. राणादा खरा राणाच आहे हे अंजलीला कधी कळणार याची प्रेक्षक वाट पाहतायत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या