JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / TRP मीटर मध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ला दणका

TRP मीटर मध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ला दणका

TRP मीटरमध्ये या आठवड्यात चढउतार पाहायला मिळत आहेत. पाहा तुमची आवडती मालिका कोणत्या स्थानावर आहे.

0107

या आठवड्याच्या एकीकडे अभिजीत आसावरीचं नवं आयुष्य सुरु झालं आहे. तर दुसरीकडे गुरुच्या आयुष्यात नव्या शनायाची एंट्री झाली आहे. त्यामुळे TRP मीटरमध्ये सध्या वेगवेगळे चढउतार पाहायला मिळत आहेत.

जाहिरात
0207

या आठवड्याच्या TRP रेटिंगमध्ये झी मराठीची लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. सध्या या मालिकेत सवतीमधील स्पर्धा त्यामुळे मदनची उडणारी तारांबळ पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0307

कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' सेलिब्रेटी पॅटर्नमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. TRP रेटिंगमध्ये 'चला हवा येऊ द्या' चौथ्या स्थानावर आहे.

जाहिरात
0407

मागच्या काही काळापासून माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका नंबर बन होती मात्र आता या मालिकेच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. ही मालिका TRP लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरली आहे.

जाहिरात
0507

झी मराठीच्या अग्गबाई सासूबाई या मालिकेनं टीआरपीमध्ये दुसऱ्या स्थानवर आहे. आसावरी-अभिजीतच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली असून ते दोघं पहिल्यांदाच बाहेर फिरायला गेले आहेत. मालिकेत हा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

जाहिरात
0607

'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका TRP रेटिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेत गणोजी शिर्के औरंगजेबाकडे जातात. गणोजीराजेंच्या पत्नी राजकुँवर बाईसाहेब संभाजी महाराजांना भेटून गणोजीराजे औरंगजेबाकडे गेले असावेत, असं त्यांना बोलून दाखवतात. औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान संभाजी महाराजांना पकडून आणण्याचं वचन बादशहाला देतो.

जाहिरात
0707

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका हळूहळू शेवटाकडे वळत असल्यानं सध्या प्रेक्षक या मालिकेला सर्वाधिक पसंती देताना दिसत आहेत. यासोबत या आठवड्यातही Zee Marathi च्या मालिकांनीच टॉप 5 मध्ये बाजी मारली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या