JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / #TRPमीटर : 'शनया'ची जादू झाली फिकी, विक्रांत सरंजामे ठरला वरचढ!

#TRPमीटर : 'शनया'ची जादू झाली फिकी, विक्रांत सरंजामे ठरला वरचढ!

दर आठवड्याला मालिकांचा रिझल्ट असतो. म्हणजेच टीआरपी रेटिंग. यावेळी कुठल्या मालिकेला कितवा नंबर मिळालाय ते पहा

0106

गेल्या आठवड्यात चला हवा येऊ दे हा शो पहिल्या पाचमध्येही नव्हता. अगोदरच्या अनेक आठवड्यात नंबर पाचवर असलेल्या या शोला जागो मोहन प्यारे या मालिकेनं धक्का मारला होता. पण आता पुन्हा 'हवा'नं आपलं स्थान परत मिळवलं आहे. गेल्या आठवड्यात सैराटचं केलेलं नाट्य भारी होतं. विशेषत: डाॅ. निलेश साबळेंनी साकारलेले नागराज मंजुळे आणि श्रेया बुगडेची सई ताम्हणकर लोटपोट हसवून गेली.

जाहिरात
0206

बरेच आठवडे तिसऱ्या नंबरवर असलेली तुझ्यात जीव रंगला आता चौथ्या नंबरवर पोचलीय. राणादाच्या कुस्तीवरून आता लाडूच्या कुस्तीकडे लक्ष लागलंय. लाडूला मुलीबरोबर कुस्ती खेळायचीय. पण प्रेक्षकांचा थोडा रस कमी झालाय खरा.

जाहिरात
0306

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत गेल्या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्यात. महत्त्वाचं म्हणजे पन्हाळगडावर झालेली शिवाजी-संभाजी यांची भेट. पिता-पुत्रांचं भावनिक नातं कलाकारांनी चांगलंच उभं केलं. त्यातल्या बिटविन द लाईन्सही चांगल्या टिपल्यात. त्याचा परिणाम मालिका नंबर तीनवर गेली.

जाहिरात
0406

या वेळच्या टीआरपी रेटिंगमध्ये धक्कादायक गोष्ट घडलीय. अनेक आठवडे नंबर वनवर असलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको नंबर दोनवर आलीय.राधिका आणि शनाया यांची झालेली युती, गुरूची गुपितं शनायानं राधिकाला सांगणं या गोष्टी वेगळ्या आहेतच. पण तरीही या मालिकेला दुसऱ्या मालिकेला जागा करून द्यावी लागलीय.

जाहिरात
0506

टीआरपी रेटिंगमध्ये झी मराठीच्याच मालिका नेहमीप्रमाणे पहिल्या पाचात आल्या आहेत. दुसऱ्या वाहिन्या तिथे अजिबातच फिरकू शकल्या नाहीत.मध्यंतरी झी मराठीची काही टीमही बदलली होती. पण तरीही रिझल्ट तेच राहिलेत.

जाहिरात
0606

...आणि अॅवाॅर्ड गोज टु 'तुला पाहते रे'. विक्रांत आणि ईशाच्या प्रेमाची रस्सीखेच पाहायला प्रेक्षकांना आवडतेय. सुबोध भावे आणि गायत्री दातार म्हणजेच विक्रांत सरंजामे आणि ईशा यांची केमिस्ट्री टीआरपी रेटिंगमध्ये चांगलीच जाणवलीय. 'तुला पाहते रे' या आठवड्यात अनेकांनी पाहिलीय. ही मालिका नंबर वनवर आलीय. विक्रांत आणि ईशाच्या लव्ह स्टोरीत पुढे काय होतंय, हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता वाटतेय. पुन्हा चाळ ते काॅर्पोरेट आॅफिस ते आलिशान बंगला ही सगळी सफर प्रेक्षकांना आवडतेय, असं वाटतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या