JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / #TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं

#TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं

दिवाळीत लोक टीव्ही कमी बघतात, असं म्हटलं जातं. दिवाळीच्याच आठवड्याचं रेटिंग समोर आलंय. पहा कुठली मालिका जास्त पाहिली गेलीय.

0106

गेल्या आठवड्यात पहिल्या पाचमध्येही नसलेला शो 'चला हवा येऊ द्या'नं आता पाचवं स्थान पटकावलंय. हे रेटिंग दिवाळीत दाखवलेल्या एपिसोड्सचं आहे. फराळाबरोबर प्रेक्षकांनी हसणंही पसंत केलेलं दिसतेय.

जाहिरात
0206

गेल्या आठवड्यात पाच नंबरवर असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आता चार नंबरवर आलीय. रायगडावर शिजणाऱ्या राजकारणानं बराच वेग घेतलाय. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट, त्यानंतरच्या घडामोडी यामुळे प्रेक्षकांना मालिका आवडू लागलीय.

जाहिरात
0306

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेनं तिसरं स्थान पटकावलंय. राणाची मॅटवरच्या कुस्तीची तयारी मालिकेत रंग भरतेय.सखी आणि अंजलीमधला तणावही प्रेक्षकांना आवडतोय.

जाहिरात
0406

'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावेला काशिनाथ सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेळ द्यायचा होता. त्यामुळे त्यानं मालिकेतून सुट्टी घेतलेली. याचा परिणाम दोन आठवडे नंबर वनवर असलेली ही मालिका आता नंबर दोनवर आलीय. या आठवड्यात आता विक्रांत सरंजामे परतलाय. त्यानं काय फरक पडतो का ते कळेल.

जाहिरात
0506

टीआरपी रेटिंगचा चार्ट पुन्हा एकदा तेच चित्र दर्शवतोय. फक्त झी मराठीच्या मालिका पाच नंबरमध्ये आहेत. अगदी झी युवालाही काही स्थान मिळत नाहीय.

जाहिरात
0606

शनाया आणि राधिका मिळून सध्या गुरूला धडा शिकवतायत. महिला वर्गाला हे पाहायला आवडतंय असं दिसतंय. मालिका पाहणाऱ्या जास्त स्त्रियाच आहेत. त्यामुळे गेले दोन-तीन आठवडे नंबर दोनवर असलेली 'माझ्या नवऱ्याची बायको' आता नंबर वनवर आलीय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या