JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Trailer: 'आप तो देश के प्रधानमंत्री है, आपकी माँ के साथ ऐसा होता तो कैसा लगता?'

Trailer: 'आप तो देश के प्रधानमंत्री है, आपकी माँ के साथ ऐसा होता तो कैसा लगता?'

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील गरिबी आणि आपली राजकीय व्यवस्था यावर टोकदार भाष्य करण्यात आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी : ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. कारण यामध्ये मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील गरिबी आणि आपली राजकीय व्यवस्था यावर टोकदार भाष्य करण्यात आलं आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अंजली पाटील यांची मुख्य भूमिका आहे. शहरातील दारिद्र आणि त्यातून तयार झालेल्या समस्या यावर प्रामुख्याने हा सिनेमा आधारेलेला आहे. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा कान्हू हा 8 वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत झालेल्या एका प्रसंगाबाबत पंतप्रधानांना पत्र लिहित असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. हा सिनेमा 15 मार्च 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या