JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: हे तर प्रभू राम! अभिनेत्याला पाहून महिला भावुक; एअरपोर्टवरच घातलं साष्टांग दंडवत

VIDEO: हे तर प्रभू राम! अभिनेत्याला पाहून महिला भावुक; एअरपोर्टवरच घातलं साष्टांग दंडवत

असे अनेक कलाकार आहेत ज्यांना लोक टीव्हीवर साकारलेल्या भूमिकेमुळे जास्त ओळखतात. त्यांना त्या भूमिका इतक्या खऱ्या वाटतात की प्रत्यक्षात भेटल्यावर ते त्यांना त्याच नावावरुन हाक मारतात.

जाहिरात

अरूण गोविल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑक्टोबर : असे अनेक कलाकार आहेत ज्यांना लोक टीव्हीवर साकारलेल्या भूमिकेमुळे जास्त ओळखतात. त्यांना त्या भूमिका इतक्या खऱ्या वाटतात की प्रत्यक्षात भेटल्यावर ते त्यांना त्याच नावावरुन हाक मारतात. अशातच असाच काहीसा एक किस्सा घडल्याचं समोर आलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. रामायणात श्रीरामाची भूमिका अभिनेता अरुण गोविलने साकारली होती. शोमध्ये त्यांना रामाची भूमिका करताना पाहून लोक त्यांना खरंच देव मानू लागले. अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांचे अरुण गोविलवरील प्रेम कमी झालेले नाही. याचा पुरावा हा व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, अरुण गोविल यांना विमानतळावर पाहताच एक महिला भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

संबंधित बातम्या

महिलेला वाटलं भगवान रामच दर्शन देण्यासाठी आले आहेत. त्यामुळे ती अरुण गोविलच्या पाया पडली. अरुणने बाईंना हात जोडून उठायला सांगितले. त्यानंतर त्यांनी महिलेसोबत फोटोही काढले. या व्हिडीओनं सगळ्यांचंच मन जिंकलं. अभिनेत्याने अनेक वेळा मुलाखतींमध्येही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. रामायण केल्यानंतरही त्यांना लोकांकडून असेच प्रेम मिळत आलं आहे.

एवढेच नाही तर एकदा अरुण गोविलला कोणीतरी सिगारेट ओढताना पाहिले होते. त्या व्यक्तीने अरुण गोविलला भरपूर रागवले. त्यानंतर त्यांनी सिगारेट पिणे सोडले. कोरोना काळात सरकारने घरी बसलेल्या लोकांसाठी पुन्हा एकदा रामायण प्रसारित केले. यानंतर पुन्हा एकदा सर्व पात्रे प्रकाशझोतात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या