आज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज सईचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मुंबईत आल्यानंतर तिनं सर्वप्रथम प्रयोगिक नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यानंतर तिनं मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत आपल्या करिअरची सुरुवात केली.
या गोजिरवाण्या घरात या मालिकेमुळं सई खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. या मालिकेत तिनं केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली.
त्यानंतर 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली. या मालिकांमुळं छोट्या पडद्यावर तिला तुफान लोकप्रियता मिळाली होती.
या लोकप्रियतेमुळंच सईला सनई चौघडे या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करण्याची संधी मिळाली. सईचा पहिलाच चित्रपट तुफान गाजला. परिणामी रातोरात तिला मराठीतील आघाडिच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळालं.
आज मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई प्रसिद्ध आहे. 'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती.
मराठीसोबतच सईनं हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. गजनी आणि हंटर या चित्रपटात तिनं साकारलेल्या भूमिका उल्लेखनिय ठरल्या होत्या.
'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स', 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.