JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जेठालालच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन; फॅमिली फोटो आला समोर

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जेठालालच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन; फॅमिली फोटो आला समोर

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Oolta Chashmah) हा असा टीव्ही शो आहे, ज्याच्या प्रत्येक पात्राची चर्चा होत असते. ‘जेठालाल’चे पात्र लोकांना खूप आवडते. गेली 13 वर्षे दिलीप जोशी हे पात्र साकारत आहेत. दिलीप जोशी यांनी ही दिवाळी अतिशय संस्मरणीय आणि खास बनवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,7 नोव्हेंबर- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’  (Tarak Mehata Ka Oolta Chashmah)  हा असा टीव्ही शो आहे, ज्याच्या प्रत्येक पात्राची चर्चा होत असते. दयाबेनपासून ते नट्टू काका आणि जेठालाल  (Jethalal)  ते चंपक लालपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल चाहते त्यांच्या घरी चर्चा करत असतात. ‘जेठालाल’चे पात्र लोकांना खूप आवडते. गेली 13 वर्षे दिलीप जोशी हे पात्र साकारत आहेत. दिलीप जोशी यांनी ही दिवाळी अतिशय संस्मरणीय आणि खास बनवली आहे. दिवाळीच्या खास मुहूर्तावर त्यांनी एक आलिशान कार  (New Car) खरेदी केली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दिलीप जोशी यांनी ‘जेठालाल’ची भूमिका साकारली आहे. जी या शोमध्ये चांगलीच पसंतीस उतरली आहे. दिलीप जोशी यांनी या दिवाळीत आपल्या घरात नवीन कारचं जंगी स्वागत केलं आहे. प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीनं दिलीप जोशी यांच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेते कारसोबत दिसून येत आहेत.हा फोटो पाहिल्यानंतर चाहते जेठालाल यांना बबिता जीसाठी विकत घेतली का? असा मजेशीर प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने लिहिलं - काही दिवसांत जेठालाल हे बबिताला गिफ्ट करतील. दुसर्‍यानं लिहिलं - अभिनंदन जेठालाल. आणखी एकाने लिहिलं – गोकुलधाम सोसायटीतही दिसेल का? दिलीप जोशी यांनी खरेदी केली ‘ही’ कार- दिलीप जोशी यांनी काळ्या रंगात चमकणारी Kia Sonet subcompact SUV कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत 12.29 लाख रुपये आहे. Kia Sonnet कारबद्दल बोलायचं झालं तर, ही त्याच्या सेगमेंटमधील सर्वाधिक पसंतीची कार आहे. या कारचे मॉडेल स्पोर्टी डिझाइनसह अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसाठी देखील ओळखले जाते. Kia Sonnet त्याच्या विभागात खूप लोकप्रिय आहे. आणि Seltos नंतर Kia India चे दुसरे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. हे मॉडेल त्याच्या स्पोर्टी डिझाइनसह, वैशिष्ट्यांची एक लांबलचक यादी आणि वेगवान पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह येते. सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही 1.2-लीटर नैसर्गिक-अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल, 1.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन पर्यायांमधून पॉवर मिळवते. दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्याने आपल्या कुटुंबासह डीलरशिपवर आपल्या नवीन कारची डिलिव्हरी घेतली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या