मुंबई, 19 जुलै : अभिनेत्री कंगना रणौत सध्या नेपोटिझमच्या चळवळीमुळे बरीच चर्चेत आहे. ती स्वत: बॉलिवूड क्षेत्रात काम करीत असली तरी येथील मोठ मोठ्या निर्मात्याविरुद्ध बोलताना ती अजिबात घाबरत नाही. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतरही तिने सिनेक्षेत्रात सुरू असलेल्या नेपोटिझमवर सवाल उपस्थित केला आहे. कंगणा तापसीला म्हणाली ब्री ग्रेड अभिनेत्री आताच एका मुलाखतीदरम्यान कंगना रणौतने तापसी पन्नूवर नेपोटिजमवरुन निशाणा साधला होता. त्यावेळी कंगणाने तापसी पन्नूला बी ग्रेड अभिनेत्री म्हटले होते. यावेळी कंगना म्हणाली – तापसीसारखे लोक म्हणतील की त्यांना नेपोटिजममुळे काही हरकत नाही. त्यांना तर करन जोहर खूप आवडतो. मात्र तुमच्यासाऱखी बी ग्रेड अभिनेत्री जी दिसायला बरी आहे, तिला काम का नाही मिळत?
तापसीने कंगनाची उडवली खिल्ली तापसीने नाव न घेता सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. त्यांनी बी ग्रेडच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तापसीने ट्विट केलं आहे की –मी ऐकलंय की दहावी आणि बारावीनंतर आता आमचेही निकाल आले आहेत. आमची ग्रेड प्रणाली आता अधिकृत आहे. मात्र आतापर्यंतच तर नंबर सिस्टिमवर वॅल्यू ठरवली जात होती ना? तापसी पन्नूने नाव न घेता कंगनावर निशाणा साधला आहे. मात्र तापसीच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देणारे अधिकतर वापरकर्त्ये तिला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.