JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तनुश्री दत्ताचं बदललेलं रूप तुम्ही पाहिलंय का?

तनुश्री दत्ताचं बदललेलं रूप तुम्ही पाहिलंय का?

इमरान हाश्मीसोबत ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटामधून तनुश्री दत्तानं आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. पण काही काळ झाला ती मोठ्या पडद्यापासून गायब आहे. 2010 मध्ये आलेल्या ‘अपार्टमेंट’ या चित्रपटामध्ये तिला शेवटचं पाहिलं गेलं. त्यानंतर काही काळ तिने चित्रपटांपासून लांबच राहणं पसंत केलं. गेली दोन वर्षे ती चित्रपटांपासूनच नाही तर ती मुंबईमधूनच गायब होती. आता ती मुंबईमध्ये परतली आहे. अलीकडेच तिला मुंबईच्या एअरपोर्टवर पाहण्यात आले आहे. तिच्या या फोटोमध्ये ती पहिल्यापेक्षा वेगळी दिसत आहे.

0106

इमरान हाश्मीसोबत 'आशिक बनाया आपने' या चित्रपटामधून तनुश्री दत्तानं आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. पण काही काळ झाला ती मोठ्या पडद्यापासून गायब आहे. 2010 मध्ये आलेल्या 'अपार्टमेंट' या चित्रपटामध्ये तिला शेवटचं पाहिलं गेलं. त्यानंतर काही काळ तिने चित्रपटांपासून लांबच राहणं पसंत केलं.

जाहिरात
0206

गेली दोन वर्षे ती चित्रपटांपासूनच नाही तर ती मुंबईमधूनच गायब होती. आता ती मुंबईमध्ये परतली आहे. अलीकडेच तिला मुंबईच्या एअरपोर्टवर पाहण्यात आले आहे. तिच्या या फोटोमध्ये ती पहिल्यापेक्षा वेगळी दिसत आहे. तिचं वजन वाढल्याचं या फोटोमध्ये दिसून आलं. पण तरीसुद्धा तिचे सौंदर्य खुलून दिसत होतं.

जाहिरात
0306

2004मध्ये जेव्हा तिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला, त्यानंतर तिने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हा ती खूप बारीक होती. पण आत्ता ती पूर्णपणे बदलली आहे. एअरपोर्टवरच्या तिच्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स घातली आहे. जेव्हा ती मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा तिचं स्माईल पाहण्याजोगं होतं.

जाहिरात
0406

चित्रपटांपासून लांब जाण्याचं नेमकं कारण होत तिचं अध्यात्माकडे ओढ. यासाठी तिने शहर देखील सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती कोईम्बतुरला एका आश्रमात राहू लागली. काधिकाळी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी तनुश्रीचं आयुष्यच बदलून गेलं होतं.

जाहिरात
0506

त्यानंतर ती लडाखला गेली आणि तिथून तिच्या आयुष्याची नवीन सुरूवात झाली. नंतर ती अमेरिकेत राहायला लागली. ती मुंबईमध्ये क्वचितच यायची. ती इतकी तिच्या आयुष्यात गुंतली होती की ती तिच्या बहिणीच्या लग्नाला देखील आली नाही.

जाहिरात
0606

तनुश्री बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध होती. तिने हिंदी चित्रपटांबरोबरच तामिळ चित्रपटांत देखिल काम केलं आहे. आत्तापर्यंत तिने चॉकलेट, ढोल, गुड बाय- बॅड बॉय यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या