‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली तब्बल 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांची आवडती बनली आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली तब्बल 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांची आवडती बनली आहे. या कलाकरांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांना फारच उत्सुकता असते. म्हणूनच आज आपण मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीबद्दल जाणून घेणार आहोत.
या मालिकेत रोशन सोढी ही लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. अभिनेत्री जेनिफर मेस्त्री बन्सीवालने ही भूमिका साकारली आहे.
जेनिफर मेस्त्री बन्सीवाल ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती सतत आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते.
जेनिफरचा पती मयूर बन्सीवाल हादेखील एक अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
जेनिफरच्या पतीने सुशांत सिंह राजपूतच्या 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि २.० सारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे.