स्वप्नील सांगतो, विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही, ते कमवायला लागतं, यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं.
निमित्त होतं ते स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरू होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. या नव्या प्रोजेक्टसाठी सिद्धार्थ आणि स्वप्नीलने बाप्पाचा आशीर्वाद घेतला.
स्वप्नील जोशी आपल्या या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला, मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही, ते कमवायला लागतं, यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.
अमृता खानविलकर म्हणाली, ‘जिवलगा’मधील भूमिका माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. मी साकारत असलेली काव्या ही आजच्या काळात जगणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला साजेसा असा एक विश्वास नावाचा जोडीदारही आहे. काव्याचं आपल्या पतीसोबत असणारं नातं हे सर्वसामान्य नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे.