JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सुशांत आत्महत्या प्रकरण : आणखी एक अभिनेता उतरला मैदानात, सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढला

सुशांत आत्महत्या प्रकरण : आणखी एक अभिनेता उतरला मैदानात, सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढला

अनेकांकडून आता याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

0105

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दिवसेंदिवस गूढ वाढतच चाललं आहे. कारण बॉलिवूडमधील एका गटामुळे सुशांतने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होत असतानाच आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधातही आरोपांची राळ उठली आहे.

जाहिरात
0205

मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच या प्रकरणात आता बिहार पोलिसांचीही एण्ट्री झाली आहे. तसंच अनेकांकडून आता याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

जाहिरात
0305

राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांची भेट घेत सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर आता अभिनेते शेखर सुमन यांनी याच मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली आहे.

जाहिरात
0405

अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले.

जाहिरात
0505

यावेळी आस‍िफ भामला व अरुण मोटवानी उपस्थित होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या