JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / "मामा तू म्हणाला होतास आपण कधी मरत नाही पण...", सुशांतच्या भाचीची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

"मामा तू म्हणाला होतास आपण कधी मरत नाही पण...", सुशांतच्या भाचीची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) बहिणींनंतर त्याच्या भाचीनेही आता अशी भावुक पोस्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. कुणीच त्याला विसरू शकलेलं नाही. सुशांतच्या बहिणी सोशल मीडियावर सातत्याने इमोशनल पोस्ट शेअर करत असतात. मात्र आता पहिल्यांदाच त्याची भाची कात्यायनी आर्या राजपूतने (Katyayni Aarya Rajput) भावुक अशी पोस्ट केली आहे. कात्यायनीला आपल्या गुलशन मामाची आठवण येत आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर त्याच्यासह एक फोटो शेअर करत,  इमोशनल पोस्ट लिहिली आहे. जी वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यातही अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कात्यायनी म्हणाली, “गुलशन मामा, मी तुझ्यावर ब्रह्मांडापेक्षाही भरपूर प्रेम करते. तू माझ्यासाठी आधीपासून अनमोल होत आणि आजही आहे. भविष्यात आपण कधी आकाशात पाहू आणि प्रत्यक्षात रहस्यवादावर चर्चा करू असा विचार मी करायचे. तुझ्या प्रत्येक बोलण्याने मला मंत्रमुग्ध केलं आणि मला नेहमी तू प्रेरित केलं. तुझा आवाज कधीच ऐकू शकणार नाही, असा दिवस येईल असं कधी कल्पनेतही वाटलं नव्हतं. तू एकदा म्हणाला होतास प्रत्यक्षात आपण कधीच मरत नाहीत. यावर मला खरंच विश्वास ठेवायचा आहे मात्र प्रत्येक दिवसाला हे खूप कठीण होतं आहे”

“कदाचित मी पॅरलल युनिव्हर्समध्ये जाऊ शकले असते, जिथं जग थोडं अधिक चांगलं असेल आणि आपण एकत्र हसू, तारे पाहू आणि तुझ्या इंटलॅक्युअल जोक्सवर एकत्र हसू. जेव्हा मी मोठी होईन तेव्हा तुला माझ्या घरी घेऊन जाणार, डोंगरावर आणि तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल अभिमान पाहेन असा विचार मी नेहमी करायचे. दुसऱ्या जगात मी असं पाहिने हे मला माहिती आहे, मात्र ती दुनिया ही नाही याची खंत वाटते” असं कात्यायनी म्हणाली. हे वाचा -  “प्रेमात एक वर्षानंतर एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो”, रियाचा VIDEO VIRAL “मी आणि जगानं तुला जितकं ओळखलं त्यापेक्षा तू वेगळा होतास. तू एका ऊर्जेने भरलेला अशी व्यक्ती होता, जिला जग थांबवू शकत नव्हती. स्वत:च्या दुःखाने मी प्रभावित होणार नाही, स्वतःचा विकास रोखू देणार नाही कारण असं झालं तर माझ्यासाठी ही शरमेची बाब असेल. तुझंच रक्त माझ्या नसानसात वाहत आहे आणि त्याचा पुरेपूर वापर मला करायचा आहे. गुलशन माम तुला माझा अभिमान वाटेल. मी तुझ्यावर नेहमी असंच प्रेम करत राहिने गुलशन मामा” कात्यायनीचीही ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतचे चाहते यावर प्रतिक्रियाही देत आहेत. हे वाचा -  सोनाक्षीचा ऑनलाइन छळ करणारा अटकेत; अभिनेत्री म्हणाली, “सावध राहा आता तुमचा नंबर” सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला मुंबईतील वांद्र्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबाने सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या