JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यांच्या मॅनेजरची आत्महत्या; 14 व्या मजल्यावरून मारली उडी

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यांच्या मॅनेजरची आत्महत्या; 14 व्या मजल्यावरून मारली उडी

दिशा सालियाननं इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जून : बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांसाठी मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या दिशा सालियान हिचा मलाडमधील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. दिशानं 14 व्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. मात्र दिशानं असं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दिशानं सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. तसेच तिनं ‘फुकरे’ स्टार वरुण शर्मासाठी सुद्धा काम केलं होतं. याव्यतिरिक्त दिशानं कॉमेडियन भारती सिंह आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचीही मॅनेजर म्हणून काम पाहिलं होतं. काल रात्री दिशानं 14 व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना घडली त्यावेळी तिचा खास मित्र तिच्यासोबत होता त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता मनमीत ग्रेवल आणि प्रेक्षा मेहता यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. लॉकडाऊनमध्ये नैराश्यामुळे या दोघांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या सुसाइड नोटवरुन स्पष्ट झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या