JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Me Too च्या आरोपामुळे सुशांत जास्त दुखावला होता; रियाने फेटाळले आपल्यावरील सर्व आरोप

Me Too च्या आरोपामुळे सुशांत जास्त दुखावला होता; रियाने फेटाळले आपल्यावरील सर्व आरोप

न्यूज 18 ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty) सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात आपल्यावरील सर्व आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर (rhea chakaraborty) अनेक आरोप लावण्यात आले आहेत. सुशांतच्या कुटुंबासह त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही रियावर आरोप लावले आहेत. शिवाय सुशांतच्या चाहत्यांनीदेखील रिया लक्ष्य केलं आहे. सुशांतचे पैसे लुटल्याचा आरोप, त्याला छळल्याचा, त्याला ड्रग्ज दिल्याचा आरोप, त्याची हत्या केल्याचा आरोप, त्याच्यावर ब्लॅक मॅझिक केल्याचा आरोप असे एकामागो एक असे अनेक आरोप रियावर लागले आहेत. या आरोपांमुळे रियाच्या मागे चौकशीचा ससेमेरा सुरू आहे. ईडी, सीबीआय आणि एनसीबी अशा तीन यंत्रणा रियावरील आरोपांचा तपास करत आहेत. रियाने मात्र आपल्यावरील हे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हणत फेटाळले आहेत. न्यूज 18 ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत रियाने या प्रत्येक आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सुशांत खरंतर मी टू च्या आरोपांमुळे जास्त दुखावला होता, असं रियाने सांगितलं. रिया म्हणाली, “अभिनेत्री संजना संघवीने सुशांतवर मी टू चा आरोप लावला, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. हे लेख पाहून त्याला खूप वाईट वाटायचं. अभिनेत्री कंगना रणौतदेखील याबाबत पुरावे दिले आहेत. सुशांत चार-पाच दिवस त्याचा विचारात असायचा. सुशांत इतका टॅलेंटेड अभिनेता होता. मलाही त्याचा अभिमान वाटायचा. मात्र त्याला कधीच कोणत्या फिल्म पुरस्कारासाठी नामांकन का मिळालं नाही? सुशांतबाबत कंगना रणौत जे काही मांडत आहेत, ते योग्य आहे असं मला वाटतं” हे वाचा -  Rhea Chakraborty EXCLUSIVE : सुशांतच्या घरातून का बाहेर पडली रिया? “संजना संघवीला पुढे करून सुशांतविरोधात कुणीतरी ते कारस्थान रचलं.  सुशांतवर खूप परिणाम झाला होता. तो सतत याचा विचार करायचा. आज माझ्यावरही तिच वेळ आली आहे. सुशांतविरोधात जसे आरोप झाले होते तसेच आरोप आज माझ्यावरही मुद्दाम केले जात आहेत. ‘जो उठतो तो आरोप करतो आहे. आता मला आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य करतो आहे. माध्यमेच आता न्याय द्यायला बसली आहेत. विच हंट सुरू आहे’, असा आरोप तिने केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या